Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका जाहीर करणार : राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेसच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका जाहीर करणार : राष्ट्रवादी काँग्रेस

nawab malik NCP support for Shiv Sena to power
काँग्रेस आमचा सहकारी पक्ष आहे. ते चार वाजता बैठक घेणार आहेत. त्यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रितपणे शिवसेनेच्या पाठिंब्याबात आपली भूमिका जाहीर करू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुंबई अध्यक्ष नवाब मलीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवसेनेला सत्तास्थापन करण्याचा दावा करण्याची वेळ राज्यपालांनी दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत दावा करायचा आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतरच शिवसेनेचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील जनतेनं युतीला कौल दिल्यानंतरी सत्तेच्या वाटपावरून शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेतली होती त्यामुळे भाजपला विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना सत्तास्थापन करणार आहे हे जवळपास निश्चित झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments