मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार तृप्ती बाळा सावंत यांचा तिकीट कापून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे सावंत अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे शिवसेनेतील बंडाळी समोर आली आहे.
वांद्रे पूर्व हा शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा तिढा सोडवताना शिवसेना पक्षप्रमुखांची दमछाक झाली. विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डच्चू देत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली आहे. यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते बंडखोर सावंतच्या सोबत जातात की शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महाडेश्र्वर यांच्या सोबत जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.