उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आमदारकीसह सदस्यत्वाचाही राजीनामा पाठविला. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ज्योती कलानी यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चि असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष भारत गंगोत्री हे विधानसभेसाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे आपला पत्ता कट होणार हे ज्योती कलानी यांना माहित होते. त्यामुळे ज्योती कलानी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दावेदारी मानली जात आहे. उल्हासनगर विधानसभेच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता नेर्माण झाली आहे. भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांनी उमेदवारी मिळण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे ताकद पणाला लावली आहे. तर, भाजपला महापालिकेत सत्तेपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा असलेले ओमी कलानी यांनीही भाजपकडून आमदारकीच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे दावा कायम ठेवला असल्याचे बोलले जात आहे.