Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादविधानसभा : एमआयएमने औरंगाबादेत दिली‘या उमेदवारांना उमेदवारी

विधानसभा : एमआयएमने औरंगाबादेत दिली‘या उमेदवारांना उमेदवारी

Asaduddin Owaisiऔरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उमेदवारांचे नाव ट्विटरवर जाहीर केले.

औरंगाबाद मध्यमतदारसंघात गोंधळ सुरु होता. खासदार इम्तियाज जलील यांनी स्थानिक नेत्यांशी पंगा नको म्हणून औरंगाबादच्या उमेदवारांचे नाव जाहीर केले नाही. चार याद्या या खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्द केल्या होत्या.

डॉ. गफ्फार कादरी (पूर्व मतदारसंघ), नासेर सिद्दीकी (मध्य मतदारसंघ), अरूण बोर्डे ( पश्चिम मतदारसंघ) या तिन्ही मतदारसंघात यांना उमेदवारी मिळाली आहे. सिद्दीकी हे विद्यमान नगरसेवक आहेत. तर बोर्डे यांच्या पत्नी या सुध्दा नगरसेविका आहेत. डॉ. कादरी हे ज्येष्ठ नेते असून त्यांना दुस-यांदा उमेदवारी मिळाली आहे. मागच्या निवडणुकीत त्याचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला होता.

दरम्यान, एमआयएम पक्षाने या आधी उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एमआयएम पक्षाने घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments