skip to content
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार नाही : शरद पवार

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार नाही : शरद पवार

haradमुंबई : मुंबईसह राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती. मी गृहखातं सांभाळलेलं आहे. त्याची मला जाणं आहे. त्यामुळे मी ईडी कार्यालयात जाण्याचे रद्द केले. अशी माहिती शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यशासनाच्या वतीने पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवारांची विनंती केली. कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही ईडी कार्यालयात जाऊ नका अशी विनंती केली. तसेच ईडीनेही मेल करुन विनंती केली होती. त्यामुळे मी तूर्तास ईडी कार्यालयात जाण्याचे रद्द केले. असे पवारांनी सांगितले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपर्क साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत माझ्या पाठिशी उभे राहिले. तसेच खासदार संजय राऊत, शिवसेना सर्व सहकार्य करणा-या नेत्यांचे पवारांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments