Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधी पदरात पाडणार!

उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधी पदरात पाडणार!

Udhav Thakaray, Devendra Fadnavis, Maharashtra CMमुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेणार आहेत. शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आमदारांच्या प्रलंबित मागण्या व त्यांची कामे होण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. व निधी पदरात पाडून घेतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्व आमदार मुंबईत आहेत. अधिवेशनाच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुखांकडे आपापल्या तालुक्यातील व भागातील विविध प्रलंबित प्रश्नांची जंत्री दिली होती. त्यामुळे आमदार आपापल्या गावाकडे जाण्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदार विधीमंडळ परिसरात उपस्थित असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments