Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeविदेशकाश्मीर प्रश्नी अमेरिकेचा मध्यस्थी करण्यास नकार: डोनाल्ड ट्रम्प

काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा मध्यस्थी करण्यास नकार: डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : काश्मीर हा भारत-पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा आहे. त्यामुळे अमेरिका त्यात मध्यस्थी करणार नसल्याची भूमिका ट्रम्प प्रशासनाने घेतली आहे. अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तान भारतावर दबाव आणण्याच्या प्रयत्नात होता, परंतु तसे काही घडले नाही. अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी ट्रम्प प्रशासनाच्या या भूमिकेविषयी माहिती दिली आहे.

हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, अमेरिकेला त्यांच्या जुन्या धोरणांनुसार चालायचे आहे. अमेरिकेला असे वाटते की, भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन त्यांच्यातले वाद मिटवावेत. काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानमधील वादावर अमेरिकेने मध्यस्थी करावी, असा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला होता. हा प्रस्ताव अमेरिकेने मान्य न करता विचाराधीन ठेवला होता. आता हा प्रस्ताव अमेरिकेकडून फेटाळण्यात आला आहे.गेल्या काही दशकांपासून अमेरिकेचे हेच म्हणणे आहे, की काश्मीर प्रश्न भारत-पाकिस्तानने आपसात सोडवावा. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार असल्याची चर्चा होती. परंतु या सर्व चर्चा आता फोल ठरल्या आहेत.

श्रृंगला यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अगोदरच स्पष्ट केले आहे की, भारत पाकिस्तान या दोन्ही देशांची इच्छा असेल तरच आम्ही काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करु. परंतु भारताने हा प्रस्ताव मान्य केलेला नाही. त्यामुळे ही बाब स्पष्ट आहे की, अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments