इस्लामाबाद – पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ पनामा पेपर घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपसंदर्भातील खटल्याच्या सुनावणीसाठी गुरुवारी लंडनहून पाकिस्तानला परतले आहेत. ते सध्या लंडनमध्ये कँसर या आजरावर उपचार घेत असलेल्या पत्नी कुलसुम यांच्यासोबत राहत आहेत.
पनामा पेपर घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या तीन खटल्यासंदर्भात नवाज शरीफ पाकच्या सर्वोच्च न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने २६ ऑक्टोबरला जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यामुळे नवाज शरीफ यांना पाकिस्तानला परत यावे लागले. त्याची सुनावणी शुक्रवारी पुन्हा सुरु होणार आहे. शरीफ यांनी लंडनच्या मीडियाला सांगितले, की ज्यावेळी त्यांना आपल्या आजारी पत्नीसोबत लंडनमध्ये राहायचे आहे. त्याचवेळी ‘खोट्या खटल्यांना’ सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानला जावे लागत आहे. या खटल्यात नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम, जावई मोहम्मद सफदर यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलैला या घोटाळ्यामुळे नवाज शरीफांना पंतप्रदानपदाला लायक नसल्याचे सांगितले होते. यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते.