Saturday, May 11, 2024
Homeविदेशज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं मोटर न्यूरॉन आजाराने निधन!

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं मोटर न्यूरॉन आजाराने निधन!

लंडन : ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालं आहे. कॅंब्रिजमधील राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. ते ७६ वर्षांचे होते. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला.

स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञान क्षेत्रात मोलाचं काम केलं असून जगभरात त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांचा विश्वाच्या निर्मितीवर प्रकाश टाकणारा अभ्यास विज्ञान क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरला तर त्यांनी अनेकदा पृथ्वी नष्ट होणार अशाही भविष्यवाणी वर्तवल्या होत्या.

स्टीफन हॉकिंग यांच्याकडे १२ सनद पदव्या आहेत. हॉकिंग्ज यांचं कार्य पाहून अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हे अंतराळातील रहस्यांवर आधारीत पुस्तक चांगलंच गाजलं होतं.  १९७४ मध्ये ब्लॅक होल्सवर असाधारण रिसर्च करून त्यांनी धमाका उडवून दिला होता. महत्वाची बाब म्हणजे स्टीफन हॉकिंग यांचा मेंदू सोडून त्यांच्या शरीराचं एकही अंग काम करत नव्हतं. स्टीफन हॉकिंग यांनी ‘द ग्रॅन्ड डिझाईन’, ‘यूनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थेअरी ऑफ एअरीथिंग’ अशी पुस्तके लिहिली आहेत.

मोटर न्यूरॉन आजार

स्टीफन हॉकिंग यांनी कमी वयातच मोटर न्यूरॉन या आजाराने धरलं. या आजारात शरीर पूर्णपणे पॅरालाईज्ड होतं. हा आजार झालेला व्यक्ती केवळ डोळ्यांचे इशारे करूनच व्यक्त होऊ शकतो. १९६३ मध्ये त्यांच्या आजाराची माहिती मिळाली. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की, हॉकिंग केवळ २ वर्षच जिवंत राहू शकतील. तरीही हॉकिंग हे कॅंब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी गेले आणि एक महान शास्त्रज्ञ म्हणून समोर आले. 

केवळ ३२ वर्षाच्या वयात १९७४ मध्ये हॉकिंग ब्रिटनच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीचे सर्वात कमी वयाचे सदस्य बनले. पाच वर्षांनी त्यांनी कॅंब्रिज विद्यापीठात गणित प्रोफेसर म्हणून नियुक्त करण्यात आले. या पदावर एकेकाळी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइंस्टाईन हे नियुक्त होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments