Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशभीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटेला अटक!

भीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटेला अटक!

महत्वाचे….
भीमा कोरेगाव दंगलीतील मिलिंद एकबोटे, संभाजी भीडे दोघे आरोपी
शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल
पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला होता


नवी दिल्ली: भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने एकबोटे यांना अटक केली. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकबोटे यांना तासाभरातच अटक झाली. 

सुप्रीम कोर्टाने बुधवारी सकाळी मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यापूर्वी हायकोर्टानेही त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला. पोलिसांनी मिलिंद एकबोटेंविरोधात तीन गुन्हे नोंदवले असून त्यात अॅट्रॉसिटी गुन्ह्याचाही समावेश आहे. पुणे सत्र न्यायालयाने २२ जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. पण उच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
१ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

काय होते प्रकरण…
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये सोमवारी १ जानेवारी रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला होता. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments