Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeविदेशती पॉर्नस्टार "डोनाल्ड ट्रम्पला" पैसे परत करणार?

ती पॉर्नस्टार “डोनाल्ड ट्रम्पला” पैसे परत करणार?

अमेरीका: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सेक्स केल्याचा दावा करणाऱ्या पॉर्न स्टारनं तोंड बंद ठेवण्यासाठी घेतलेले एक लाख ३० हजार डॉलर्स परत करण्याची तयारी दर्शवली आहे. स्टॉर्मी डॅनियल असं नाव धारण केलेल्या या पॉर्न स्टारनं म्हटलंय की २०१६ मध्ये एक करार करण्यात आला ज्यानुसार तिला एक लाख ३० हजार डॉलर्स देण्यात आले. मात्र, त्या परिस्थितीबद्दल खुलेपणानं बोलता यावं यासाठी ती कराराची रक्कम परत करण्यास तयार आहे. या संदर्भातल्या तिच्या वकिलांच्या पत्रव्यवहाराची प्रत असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने मिळवली असून त्याआधारे हे वृत्त दिले आहे.

ट्रम्प यांचा वकिल मायकेल कोहेन यांना हे पत्र पाठवण्यात आलं असून पैसे परत दिल्यानंतर गोष्टी गुप्त ठेवण्याबाबतचा तो करार रद्द होईल असे म्हटले आहे. तसेच स्टॉर्मी जिचं खरं नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे, ती आपल्या संबंधांबद्दल बोलू शकेल तसेच तिच्या स्वातंत्र्य दडपण्यासाठी व तिला गप्प करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रकारांबाबतही ती मोकळेपणाने बोलू शकेल असं तिच्या वकिलांनी म्हटलं आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या वकिलांनी या प्रस्तावाचा विचार करावा आणि स्टेफनीला तिची बाजू मांडू द्यावी अशी विनंती तिच्या वकिलांनी केली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांच्या वकिलांनी अद्याप तरी काही प्रतिसाद दिलेला नाही. असाही हा करार अवैध आहे कारण राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी काही दिवस घाईघाईत करण्यात आला आणि त्यावर वकिलांच्या सह्या आहेत, ट्रम्प यांची सही नाही असा दावाही स्टेफनीच्या वकिलांनी केला आहे. या करारामध्ये ट्रम्प यांचा उल्लेख डेव्हिड डेनिसन व स्टेफनीचा उल्लेख पेगी पॅटिसन असा करण्यात आला असून त्यांची खरी ओळख सोबत जोडलेली आहे.

हा करार नोटरीनं काळजीपूर्वक बघितला होता का याची चौकशी सरकारी अधिकारी करत आहेत. कागदपत्रावर नोटरीचा स्टॅम्प आहे, परंतु त्यावर सही वा तारीख नसून कुठल्या सहीचा नोटरी साक्षीदार आहे हे ही प्रमाणित करण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी दाखवले आहे. यापैकी कुठलेही आरोप खरे नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. त्यावर पुन्हा प्रतिक्रिया देण्यास व्हाईट हाऊसनं नकार दिला आहे.
ट्रम्प यांच्या वकिलानं म्हटलंय की कदीही हे प्रेमप्रकरण नव्हतं आणि एक लाख 30 हजार डॉलर्स त्यानं स्वत: भरले असून त्याचा ट्रम्प ऑर्गनायझेशन अथवा ट्रम्प कँपेनचा काहीही संबंध नाही. तर या चर्चेची ट्रम्पना कल्पना होती असा दावा क्लिफर्डनं केला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असणं हे काही बाबींचं उल्लंघन असल्याचं एका तज्ज्ञानं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments