मधुबनी – नेपाळची राजधानी काठमांडूला जाणारी एक बस त्रिसूला नदीमध्ये कोसळल्याने मधुबनी जिल्ह्यात ३१ प्रवाशासह एका मातेचा व तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये ११ मुलांचा समावेश असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती देताना मनोज ठाकूर या प्रवाशांनी सांगितले, की बस त्रिसूला नदीच्या पुलावरुन खुपच वेगाने जात होती. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ५० फुट खोल नदीमध्ये ही बस कोसळली. नदीमध्ये पाणी ज्यास्त असल्याने बस पूर्णपणे बुडाली आहे. या घटनेतील आम्ही ५ जण प्रवास करत होतो, त्यापैकी ५ जण जीवंत वाचलो असून बसचा चालक फरार झाला आहे.या घटनेत मृत झालेल्या महिला आणि तिच्या मुलाची ओळख पटली आहे. मधुबनीच्या राजनगर पोलीस क्षेत्रांतर्गत बरहारा गावात राहणाऱ्या ममता ठाकुर आणि मनीष ठाकुर अशी त्यांची नावे आहेत.१४ वर्षांपूर्वी याच ठिकाणी ब्रिटिश सैन्यात कार्यरत असणाऱ्या लोकांची बस नदीत कोसळली होती. या घटनेत ५२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मागील ३ वर्षात याच ठिकाणी झालेल्या अपघातात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.