जिनीव्हा – संयुक्त राष्ट्राच्या विशेष अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ या वर्षात ३० हून अधिक पत्रकारांच्या जाणीवपूर्वक हत्या करण्यात आल्या आहेत. पत्रकारांवर होणारे हल्ले व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याविषयी बोलताना एग्नेस कॉलमर आणि डेविड काये यांनी ही घोषणा केली. तसेच त्यांनी या हल्लेखोरांवर कारवाई करण्याचीदेखील मागणी केली आहे.
पत्रकारांवर होणाऱ्या या हल्ल्यामागे वैयक्तिक प्रश्नाशिवाय पत्रकारांमधील सार्वजनिक विकासाचा दृष्टीकोन जो लाकशाहीस गरजेचा आहे तो नष्ट करणे हा मुख्य उद्देश असल्याचा आरोप बुधवारी या दोघांनी केला आहे. मात्र, पत्रकारांवर होणारे हे हल्ले निंदनिय असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकारावंर होणाऱ्या अशा हल्ल्यांचा तपास अधिकाऱ्यांना पाठपुरावा करणे शक्य होत नाही, तेव्हाच असे गुन्हेगार आपले उदिष्ट साध्य करतात. अशा शब्दात तपासयंत्रणेवर टीका देखील त्यांनी केली आहे. तसेच, पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्याची गरज आहे. मात्र, राजकीय स्तरावरून असे अहवाल प्रसिद्ध करणाऱ्यांवर दडपण येते असेही ते म्हणाले.