मनिला – भारत आणि अमेरिकेचे संबंध केवळ दोन्ही राष्ट्रांपूरतेच मर्यादित नाहीत, तर आशियाच्या भविष्याकरता दोन्ही देश एकत्रित काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे सुरू असलेल्या आसियान राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. याभेटीनंतर उभय नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चीनचे वाढते प्रभावक्षेत्र, उत्तर कोरीयाची आण्विक चाचणी, यापार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जाते. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प याची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी उभय नेत्यांची भेट जून महिन्यांत वॉशिंग्टन येथील परिषदेदरम्यान झाली होती. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या फिलिपाईन्स दौऱ्यावर आहेत.