Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeविदेशइराकमध्ये चकमकीत ५ आंदोलक ठार, ९० जखमी

इराकमध्ये चकमकीत ५ आंदोलक ठार, ९० जखमी

सुलेमानिया – उत्तर इराकच्या कुर्दिश भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत किमान ५ आंदोलक मारले गेले. या घटनेत इतर ९० जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यातील दंगलीत ३६ सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सुलेमानियाचे सार्वजनिक आरोग्य संचालक राणा तहा मोहम्मद यांनी दिल्याची माहिती आनाडोलू एजन्सीने दिली आहे. सोमवारपासूनच सुलेमानिया येथे नागरिक (सिव्हिल सिर्व्हिस) विलंब वेतन आणि सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत आहे. मंगळवारी, निदर्शकांनी परिसरात अनेक सार्वजनिक सुविधाना आग लावली. हा हिंसक संघर्ष आणि नुकसान रोखण्यासाठी स्थानिक अधिकारांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. कुर्दिस्तान देशभक्त संघटना आणि गोरान आंदोलन यासह सुलेमानिया कुर्दिश प्रांतातील प्रमुख विरोधी पक्षांचा बालेकिल्ला मानला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments