महत्वाचे…
१. आपल्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे दोषी २. पॅट्रीसियाला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ३. अमेरिकेच्या ओल्काहोमा प्रांतात जवळच्या नात्यातील वक्तींशी लग्न करणे अनैतिक समजले जाते
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ओल्काहोमा येथील एका महिलेला आपल्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे दोषी ठरवण्यात आले आहे. पॅट्रीसिया स्पॅन (४४) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने तिची २६ वर्षीय मुलगी सिस्टी स्पॅन हिच्याशी २०१४ मध्ये लग्न केले होते.
पॅट्रीसियाने २०१६ मध्ये कॉमान्सो काऊंटी येथे तिच्याच मुलीसोबत लग्न केले होते. या महिलेच्या दोन्ही मुलांचे संगोपन त्यांच्या आजीने केले होते. ‘द इंडिपेंडंट’च्या अहवालानुसार ५ महिन्यांनंतरच चाईल्ड वेल्फेअरच्या चौकशीदरम्यान या गोष्टीचा खुलासा झाला. पॅट्रीसियाने फसवून लग्न केल्याचा आरोप सिस्टीने केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पॅट्रीसियाला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
२००८ मध्ये या महिलेने आपल्या मुलाशी लग्न केले होते. कोर्टाच्या दस्तावेजांनुसार १५ महिन्यानंतर मुलाने याला चुकीचे संबोधत कोर्टात याचिका दाखल करत हे लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. पॅट्रीसियाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, खूप वर्षांनी भेटल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र, त्या दोघांचे अनैतिक संबंध उघड झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती.
मिस्टीच्या म्हणण्यानुसार त्याच्या आईने त्याला फसवून त्याच्याशी लग्न केले. मिस्टी याने दाखल केलेल्या याचिकेनंतर या लग्नाला रद्द ठरवण्यात आले. अमेरिकेच्या ओल्काहोमा प्रांतात जवळच्या नात्यातील वक्तींशी लग्न करणे अनैतिक समजले जाते. असे केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो.