skip to content
Friday, May 24, 2024
Homeविदेशरिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

स्वीडन: यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना मिळाला आहे. व्यावहारिक अर्थशास्त्राच्या योगदानाबद्दल थेलर यांचा सन्मान करण्यात आला. अर्थशास्त्राचं मानसशास्त्र समजून सांगणात थेलर यांचा हातखंडा आहे, त्याबद्दलही नोबेल समितीने थेलर यांची निवड केली.

१९४५ साली जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या ७२ व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं.

आर्थिक समस्या कशा दूर करता येतील, याबाबत रिचर्ड थेलर यांनी सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे.

यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही होते. त्यामुळे या पुरस्काराकडे देशवासियांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, १९९८  मध्ये भारताचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments