वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत होरपळून निघालं आहे. वणव्यामुळे लागलेली आग इतकी मोठी आहे की, या आगीत जवळपास ७ हजार हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे तर १५०० घरं भस्मसात झाली आहेत.
अनेक मराठी कुटुंबानाही या आगीचा फटका बसला आहे. वणव्यात १० जणांचा मृत्यू तर १०० जण जखमी झाले आहेत.कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे हा वणवा कॅलिफॉर्निय़ातल्या ७ जिल्ह्यांमध्ये पसरला. सध्या या सर्व भागातला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर काही राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. अॅनहेम जिल्ह्यातील नागरिकांना घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.