बर्न – जगभरात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्याची परंपरा हजारो वर्षं जुनी आहे. सध्या चलनात असलेल्या नोटा अस्तित्वात येण्यापूर्वी सोनं हेच चलन होतं. व्यवहारासाठी सोन्याची नाणी वापरली जायची. जर हेच सोनं गटारीत वाहून जात असेल सर्वांना धक्का बसणारच! स्विस वैज्ञानिकाच्या दाव्यानुसार स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक वर्षी गटारीतून ४३ किलो सोनं वाहून जातं. त्याची किंमत १.८ मिलीयन डॉलर म्हणजेच सुमारे १२ कोटी रुपये एवढी आहे. सरासरी जगातील ७० टक्के सोनं हे स्वित्झर्लंडमध्ये वाहून जात असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. याबाबतचा खुलासा स्वित्झर्लंड मधील ब्लूमबर्ग या वृत्तपत्रानं सर्वात आधी केला.
स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ एक्वाटिक सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अहवालानुसार देशाच्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेतून गाळ आणि सांडलेल्यात पाण्यात हे सोनं वाहून जातंय. पाण्यात वाहून जाणाऱ्या सोन्यामुळे वातावरणाला कोणताही धोका नसला तरी त्याच्यावर पुनरुत्पयोग फायदेशीर ठरणार नाही. वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्यामधून सोनं कसं वेगळ केलं जाईल यावर वैज्ञानिकांनी संशोधन सुरु केलं आहे. त्याला लवकरच यश मिळेल असे सांगण्यात आलं आहे.
वैज्ञानिकांनी गटारील वाहून गेलंलं सोनं शोधण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यावर त्यांच काम सुरु असून लवकरच ते अंमलात आणलं जाईल. टेशिनो भागामध्ये रिफाइनरी प्रक्रियेद्वारे मुबलक प्रमाणात सोनं मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. यासाठी पैसाही कमी लागेल आणि श्रमही. ४३ किलो सोन्याशिवाय दरवर्षी तीन हजार किलो चांदीही स्वित्झर्लंडमध्ये गटारातून वाहून जात असल्याचे वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात आढळून आलं आहे. त्याची किंमत 1.7 मिलीयन म्हणजेच जवळपास 11 कोटी 50 लाख रुपये आहे.