आपल्या लिखानाच्या जोरावर आणि वकृत्वशैलीमुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत देशभरात नेहमीच चर्चेत राहतात. महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेच्या सोपानावर बसवण्यासाठी संजय राऊतांनी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात महत्वाच्या दहा नेत्यांमध्ये संजय राऊतांचे नाव गणले जाते. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर देवून चारही मुंड्या चित करण्यात संजय राऊत पटाईत आहेत. रोखठोक संजय राऊत अशीच त्यांची ओळख आहे.
संजय राऊत यांचे ठाकरे कुटुंबियांसमवेत कौटुंबित नाते असून हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे संजय राऊत हे विश्वासू होते. तोच स्थान आताही कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या महत्वाच्या निर्णयामध्ये संजय राऊत यांची महत्वाची भूमिका असते. संजय राऊत हे शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जातात. कोणत्या क्षणी काय वक्तव्य करायचे, काय भूमिका घ्यायची यामध्ये संजय राऊत पटाईत आहेत. त्यामुळे विरोधकांना संजय राऊत,शिवसेनेला उत्तर देणे थोडे जड जाते.
संजय राऊत हे राज्यसभा सदस्य म्हणून महाराष्ट्राचे मराठी माणसांचे नेहमीच संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करतात. पक्षासाठी काम करणारे, सत्ता असल्यामुळे महत्वाची पदे घेऊ शकतात परंतु ते त्यापासून अलिप्त आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर रोखठोक बोलणे, त्यांना जाब विचारणे हे संजय राऊतांसाठी काही विशेष नाही. संजय राऊत सध्या धार्मिक राजकारणापासून थोडे सावध राहतांना दिसतात. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे. हेच त्यांच्या वागण्यावरुन दिसून येत आहे.
हेही वाचा: “बँका विकल्या जात असताना पंतप्रधान बंगालमध्ये स्वप्ने विकायला आले”;ममता बॅनर्जी कडाडल्या
भाजपने २०१४ मध्ये शिवसेनेसोबतचा घरोबा तोडून स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर सत्तेसाठी भाजपने पुन्हा शिवसेनेचा पाठिंबा घेऊन त्यांनाही सत्तेत सहभागी करुन घेतले होते. परंतु त्यावेळी भाजपने शिवसेनेसोबत दगाफटका देऊन स्वत:ची ताकद वाढवून घेतली होती. तेव्हापासून शिवसेनेचे मंत्री,आमदार सत्तेत असतानासुध्दा विरोधकाप्रमाणे वागत होते. मात्र त्याचा वचवा संजय राऊतांनी २०२०मध्ये काढला. भाजपची फारकत घेऊत कट्टर विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तास्थापन केली. या सगळ्या घडामोडीमागे संजय राऊतांचा हात होता.
संजय राऊत हे धडाडीचे पत्रकार असून मराठी वृत्तपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनाची ओळख शिवसेनेचा मुखपत्र म्हणून आहे. संपादक आणि नेता ह्या दोन्ही भूमिका संजय राऊत बजावतात. संजय राऊत काय लिहीणार काय प्रतिक्रिया देणार याकडे देशभरातल्या मीडियाचा लक्ष त्यांच्यावर असतो. दररोज माध्यमांना एका प्रकारे संजय राऊत खाद्य पुरवतात. त्याच्यावर विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. दिवसभर त्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा असते. काही वेळा विरोधकांकडून त्यांना ट्रोलही केले जाते. परंतु तो आपला ठाकरी बाणा कायम ठेवत सतत लिखाण करत असतात. सडेतोड उत्तर देत असतात.
संजय राऊतांमध्ये लिखाणशैलीचे गुण आहेत तसेच त्यांच्यामध्ये एक कलाही दडलेली आहे. ती कला म्हणजे चित्रपट निर्मीतींची. संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंवर चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळाला होता. क्राईम रिपोर्टरपासून पत्रकारितेला सुरुवात करणारे संजय राऊत हे संपादक म्हणून सध्या काम करत आहेत. संजय राऊतांच्या लिखाणामुळे बाळासाहेब प्रभावीत झाले होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर संजय राऊतांनी एक एक शिखरे पार पाडली. विशेष म्हणजे राज्यसभा सदस्य अशी भूमिका ते सध्या पार पाडत आहेत. बाळासाहेबांमुळे भरपूर शिकायला मिळाले असं संजय राऊत नेहमीच सांगतात. त्यामुळे संजय राऊतांच्या बोलण्यात,लिहीण्यात ठाकरीबाणा दिसून नेहमीच दिसून येतो.
हेही वाचा: वेळीच आवाज उठवला नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; आमदार रोहित पवारांचा इशारा
शिवसेनेची स्थापना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या कारणासाठी झाली होती. परंतु कालांतराने शिवसेनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. मात्र त्यांनी ती प्रतिमा आता बदलली असून, न्याय व हक्कासाठी शिवसेनेचा लढा सुरु आहे. शिवसेनेने आज ग्रामपंचातपासून ते लोकसभेपर्यंत आपले अस्तित्व निर्माण केले आहे. गल्ली ते दिल्ली शिवसेनेचे जाळे पसरले आहे. त्यामुळे शिवसेना आता मुख्य राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करुन ते मुख्यंत्री म्हणून चांगले कार्य करत आहेत.
संजय राऊत यांच्या संपादकीय,वक्तव्यांची आणि ट्विटची देशभर चर्चा असते. संजय राऊत एखाद्या विषयावर काय ट्विट करणार याकडे माध्यमांच लक्ष असतो. त्याचीच बातमी ही दिवसभर सुरु असते. काही ट्विट आणि विधानामुळे ते प्राईट टाईमवर तोच विषय चर्चेत असतो, डिबेटही होतात. सोशल मीडियावर बाजूने बोलणारे किंवा विरोधात बोलणारे असे दोन गट दिसून येतात. त्यामुळे माध्यमांमध्ये संजय राऊत हा एकमेव नाव आपल्याला दिसून येतो.
हेही वाचा: ‘मिथून चक्रवर्ती भाजपात दाखल होताच दिला ‘हा’ इशारा
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या विरोधात दहा वर्ष जुनं कर्ज प्रकरण उकरून काढण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी केली. मात्र त्यातून काहीही साध्य झालं नाही. त्यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या शंभर नेत्यांची माझ्याकडे यादी आहे अशा इशारा दिला होता. ती यादी पंतप्रधान,अर्थमंत्री,ईडीकडे मी पाठवणार त्याबाबत काय कारवाई होणार हे मी बघतो असा इशारा दिला होता. त्याची खूप चर्चा झाली होती.
हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, बहुतेक आयुष्य गिरगाव मुंबईमध्ये गेले आहे. वेगवेगळ्या काळात शिवसेनेला आणि त्यांच्या नेत्यांना मी जवळून पाहिले. शिवसेनेचे कार्य पाहून मी मोठी झाले आहे.