ज्यावेळी लोकप्रियता कमी होती आणि जनता नाकारते त्यावेळी तो पक्ष संस्थेच काही तरी चुकत किंवा ती कुठे तरी कमी पडते. राष्ट्रवादीचंही असच काही घडलय. जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील विश्वास उडालाय. राष्ट्रवादीला स्थानिक संस्थामधून मिळालेले अपयश हे याचेच उदारण आहे. राष्ट्रवादीचे भाजपाशी जवळीकता तसेच भाजपाच्या मंडळींकडून शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळणे असा खेळ काही दिवसांपासून चालत आलेला आहे. भेटी-गाठी वाढलेल्या याचा फटका राष्ट्रवादीला निवडणूकांमधून चांगलाच बसला. राष्ट्रवादीला -उशीरा का होईना कळाल्यामुळे दस्तरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवारांनाच जाहिर करावे लागले की, शिवसेनेने भाजपाचा पाठिंबा काढल्यानंतर आम्ही पाठिंबा देणार नाही. आम्ही समविचारी पक्षासोबत आघाडी करु. पवार हे दूरदृष्टीचे नेते असल्यामुळे त्यांनी परिस्थिती ओळखून आमचा कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा निर्णय नाही असे त्यांना जाहीर करावे लागले. मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात निमंत्रण द्यायचे नाही असा निर्णय घेतला. येत्या २५ नोव्हेंबरपासून सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करणार आहे. १ डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढली जाणार असून, ११ डिसेंबरला ही पदयात्रा नागपूर अधिवेशनावर धडकणार आहे. महागाई,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीसह अनेक मुद्यांवरुन जनता संतप्त असतांना सरकार विरोधात राष्ट्रवादी ने पूर्वीच आक्रमक होणे गरजेचे होते. उशीरा का होईना त्यांना शहाणपण सूचलयं. राष्ट्रवादी नेत्यांशी भाजपाशी वाढत्या जवळीकतेमुळे स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला फटका बसला. राष्ट्रवादीला आलेल अपयश त्यामुळे राष्ट्रवादीला पुर्नेजिवीत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नुकतीच चिंतन बैठक झाली. राष्ट्रवादीने गांभीर्याने जनतेचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाही. आक्रमक पणा दाखवला नाही, तर राष्ट्रवादीच काही खर नाही अशी भूमिका दस्तुरखुद्द राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांनी मांडली. भाजपापेक्षा काँग्रेसशी जुडवून घ्यावे अशा सूचना शरद पवारांना त्यांच्या पक्षातील नेत्यांना कराव्या लागल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे चांगले नेते आहेत त्यांनी अशीच सातत्या ठेवली पाहिजे. गांधी कुटुंबियांची काँग्रेसला एकसंघ ठेवण्याची भूमिका महत्वाची असतं अस पवारांनीही मान्य केली आहे. गुजरातमध्येही काँग्रेस सोबत जाण्याची इच्छाही व्यक्त केली. समविचारी पक्षांसोबत जाण्याचा पवार यांनी निर्णय घेतला. त्यांनी त्यांची भूमिका लवकर जाहीर केली बरं झाल. परंतु पवारांच राजकारण बघता त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. राष्ट्रवादीन जो विश्वास गमावला आहे तो विश्वास त्यांना आधी प्राप्त कराव लागेल तरच त्यांच्या पक्षाला अच्छे दिन येतील.