Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकमळाबाईला ‘शिवसेनेसोबत’ नांदायचे!

कमळाबाईला ‘शिवसेनेसोबत’ नांदायचे!

धी कुणाचं कुणावर प्रेम उफाळून येईल हे सांगता येत नाही. शिवसेना पुढील निवडणूका ‘स्वबळावरच’ लढणार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच जाहीर केलेली आहे. भाजपाला अर्थातच कमळाबाईंना जुनं २५ वर्षाच्या संसाराची आठवण आली आणि मोडलेल संसार पुन्हा जोडून शिवसेनेसोबतच नांदायची हौस आली. भाजपाचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेचा कळवळा नाही. उत्तरप्रदेश व बिहार, राज्यस्थान, मध्यप्रदेश, पंजाब येथे ज्या पोटनिवडणूका झाल्यात त्या निवडणूकांमध्ये कमळाबाईल पराभव पत्कारावं लागलं. कमळाबाईला महाराष्ट्रातही भीती वाटू लागल्याने पुन्हा शिवसेनेसोबत नांदायचे आहे. परंतु शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत ‘एकला चलो रे’ या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र कमळबाईच्या पक्षातील नेते घोषणा करतात की, शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्र लढणार, असा थेट दावा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला. मात्र एकतर्फी प्रेमप्रकरणासारखी परिस्थिती निर्माण झाली. कारण शिवसेनेने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. खासदार संजय राऊत यांनी तर ‘शिवसेनेने काय करायचं हा निर्णय फक्त उद्धव ठाकरे घेतील, इतर कोणी त्यात लुडबूड करु नये.’ अशा शब्दात मुनगंटीवार यांना उत्तर दिलं आहे. ‘भाजपच्या लोकांना झोपेतसुद्धा ‘सामना’ दिसतो आणि ते दचकून उठतात, पराभवाची भीती भाजपच्या मानगुटीवर बसली आहे. गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर खोचक टीका केली. खरच कमळाबाईला शिवसेनेने तलाक दिल्यानंतरही ती शिवसेनेसोबत संसार थाटण्यासाठी एवढी उतावीळ का आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी देखील सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरु झाली. सर्व मतदार संघात शिवसेना आपले उमदेवार देणार असल्यामुळे शिवसेनेत तिकिटासाठी आजी माजी शिवसैनिक परतले आहेत. परंतु मुनगंटीवार स्वत: चोंबडेपणा केलेला नसून हायकमांडने आदेशाने शिवसेनेला इशारे देण्याचे काम केले. जी शिवसेना सध्या सत्तेत असून केंद्र आणि राज्य सरकारवर दररोज टीका करते. त्याच शिवसेनेसोबत कमळाबाईल पुढचा संसार करायचाच आहे. परंतु हे आज अचानक घडले नाही. विरोध एकत्र येत असून आपल काही खरं नाही या भीतीने मुनगंटीवार यांनी शिवसेने सोबत लढू असे जाहीर केले. सत्तेच्या लालसेपोटी कधीही काहीही घडू शकते. ‘शिवसेनेने काय करायचं हा निर्णय फक्त उद्धव ठाकरे घेतील, इतर कोणी त्यात लुडबूड करु नये.’ अशा शब्दात संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांना उत्तर दिलं आहे. तरी सुध्दा कमळाबाईवर काही परिणाम होत नसतील तर भाजपा पुढे सत्ता हस्तगत करण्यासाठी किती लाचार झाली आहे हे संपूर्ण तमाश्यावरुन स्पष्ट होते.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments