Sunday, September 15, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखदानवेंची शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची मस्तवाल भाषा!

दानवेंची शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची मस्तवाल भाषा!

पोलिस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, असे बेजबाबदार विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. खरतर शेतकरी असो की,अजुन कुणी आंदोलनकर्ते असो त्यांच्या छातीत काय पायावरही पोलिस गोळ्या मारु शकत नाही. मात्र सत्तेची गुर्मी आणि स्वत:ला शेतकरी म्हणणारे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दानवे यांची भाषा ही मस्तवालच आहे. दानवे यांचे शेतकऱ्याविरोधात विधान पहिलेच नाही. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांनाही कितीही दिले तर ‘साले’ रडतच असतात असे विधान केले होते.खरतर त्यावेळी त्यांच्या विधानाचा सर्वस्तरातून निषेध करण्यात आला होता.लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शेतकरी ऊसदरसाठी आंदोलन करत होते. ते काही गुन्हेगार किंवा अतिरेकी नव्हते. जगाचा पोशिंदा म्हणून आपण ज्यांच्याकडे मोठ्या आशेने बघतो तो शेतकारी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येत असेल तर त्यात काय चुकले? होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून तोंडाला पाणे पुसण्यात आली. अद्यापही संपूर्ण शेतकऱ्यांना सरकट कर्जमाफी देण्यात आली नाही. युतीचे सरकार आले तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्येही वाढ झाली. जर शेतकऱ्यांच्या मागण्या आधीच पूर्ण झाल्या असत्या तर त्यांना आंदोलन करण्याची गरजही नसती. एकीकडे शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची भाषा करायची. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे. सरकार पैसा नाही म्हणून बोंब मारली जायची. तर दुसरीकडे उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांचे कर्ज द्यायचे, विजय माल्यासारखा व्यक्ती हजारो कोटी रुपये घेऊन विदेशात पळ काढतो. मात्र शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्यासाठी पैसा नाही अशी ओरड सरकारकडून केली जाते ही गंभीर बाब आहे. सत्ताधारी पक्षाती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दानवे  “मुख्यमंत्र्यांनी गृहखातं सांभळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार आहे. अशी भाषाही करत आहेत.पण गोळीबार करण्याची गरज काय होती. जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर करुण घडलेल्या प्रकाराव पर्दा टाकता येणार नाही. युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहेत. शेतकरी संघटना विरोधक,आता तर दस्तुरखुद्द सत्तापक्षातील खासदार नाना पटोले यांनीही सरकारकडून शेतकऱ्यांकडे कसे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. यावरही त्यांनी टीका केली. सत्तेत येण्यापूर्वी जी वचने भाजपाने दिली होती त्यातील एकही वचन साडेतीन वर्षात पूर्ण झाले नाही. येत्या काही दिवसात शेतकरी संतप्त झाला तर सरकारला त्यांना आवरणे अवघड जाईल. अशीच परिस्थिती सध्याची राज्यातील व देशातील दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments