Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनाराज ‘नानां’चे बंड!

नाराज ‘नानां’चे बंड!

सरकार हे शेतकरी विरोधी असून, सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकले नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या हे सरकार पूर्ण करु शकत नाही असा ठपका ठेवत सरकारच्या धोरणाला कंटाळून अखेर भाजपाचे ‘नाराज’ खासदार ‘नाना पटोले’ यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन एका प्रकारे सरकारला चांगला झटका बसला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, असा संदेश पटोले यांच्या राजीनाम्यातून देशात गेला. पटोले यांनी पूर्वीच इशारा दिला होता की, इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, आणि आज एका प्रकारे राजीनामा देऊन त्यावर शिक्कामोर्तब केला. परंतु ही वेळ सत्ताधारी पक्षातील खासदारवर का आली याचीही चर्चा होणे अपेक्षीत आहे. निवडणूकीच्या वेळी भाजपाने शेतकऱ्यांना स्वामिनाथन अयोगानुसार शेतमालाला भाव देण्याच वचन दिलं होत. परंतु साडेतीन वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकरी संकटात असतांना त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचाही लाभ मिळाला नाही,ऑनालाईन अर्जाला त्यांचा विरोध होता. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी विधान केले होते की, राज्यात दहा लाख बोगस बँक खातेदार शेतकरी आहेत. यावरुनही पटोले नाराज झाले होते त्यांनी महसूल मंत्री यांचे विधान हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पटोले गेले होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची काहीही माहिती नाही अस सांगितल होतं. पटोले यांनी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. कुणाच्या खुर्चीवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील, तर ती खुर्चीच परत देऊ असं म्हणत पटोले यांनी पुढचे संकेत दिले. आता त्याला पूर्ण विराम मिळाले. मोदी सरकार हे अंबानी आणि अदानी यांची घरं भरण्याचं काम करत असल्याचा सनसनाटी आरोप पटोले यांनी केला होता. तसेच विधानसभेतील अधिकृत रेकॉर्ड काढून पाहा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी, फडणवीस सरकारला काहीही फरक पडणार नाही”, असं  नाना पटोले यांनी आरोप केला होता. एकुणच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामकाजावर पटोले हे नाराज होते. परंतु ऐन गुजरात निवडणूकीच्या मतदानाच्या काही तासापूर्वी त्यांनी राजीनामा देऊन पक्षालाही अडचणीत आणण्याचे काम केले. नुकतेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी विदर्भात अकोला येथे आंदोलन केले होते या आंदोलनालाही पटोले यांनी पाठिंबा दिला होता. भाजपात मोठ्या प्रमाणात नाराजी असून,यशवंत सिन्हा,शत्रुघ्न सिन्हा,अरुण शौरी,नाना पटोले यांच्या रुपाने समोर येत आहे. गुजरात विधानसभेचा निकाल हा भाजपाच्या विरोधात गेला तर पक्षात मोठ्या प्रमाणात नाराज नेते हे उघडपणे बोलतील. मात्र नाना पटोले यांच्या राजीनाम्याने पक्षाच्या विरोधात चुकीचा संदेश गेला एवढ मात्र निश्चित.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments