Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमोदींचा ‘यु टर्न’!

मोदींचा ‘यु टर्न’!

देशाची राजधानी दिल्ली दंगलीची धग कायम असताना गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी विरोधकांनी रणकंदन केले होते. सोमवारी दिवसभर हा गोंधळ सुरु असताना रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी सोशल मीडिया सोडू इच्छितो, अशा प्रकारचे ट्विट केले. सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली. पंतप्रधानांच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात ‘नो सर’ ट्रेन्ड करायला लागलं. तर काहींनी खोचक प्रतिक्रियाही उमटल्या. मंगळवारी सकाळीही हा टॉप ट्रेन्ड होता. हा हॅशटॅग वापरून चाहते पंतप्रधानांना सोशल मीडियातून बाहेर न पडण्याची विनंती केली. दुपारी पंतप्रधानांनी पुन्हा ट्विट करुन आपण सोशल मीडिया सोडणार नसल्याचे स्पष्ट करत ‘यु टर्न’ घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्तानं सोशल मीडियाद्वारे एक नवीन उपक्रम जाहीर केलाय. आपल्या आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव यानिमित्तानं केला जाणार आहे. महिलांसाठी एक दिवस सोशल मीडिया समर्पित केला आहे. परंतु पंतप्रधान सोशल मीडियामध्ये, प्रसार माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे समर्थकांनी पंतप्रधानांना सल्ले दिले तर विरोधकांनी जोरदार फटकेबाजी करत टोलेही लगावले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदीजी व्देष सोडा, सोशल मीडिया नको, असा सल्ला मोदी यांना दिला. पंतप्रधान मोदींच्या मनात द्वेष आहे, अशी टीका अनेक वेळा राहुल गांधी यांनी केलेली आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांचे लाखो फॉलोअर्स अनाथ होतील, त्यांना अनाथ करणं ठिक नाही. हे त्यांचे सायबर योद्धा आहेत, योद्धा सेनापतीच्या आदेशानुसार काम करतात. सेनापतीच सोशल मीडियाचं मैदान सोडणार असतील तर फौज काय करेल?असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. विशेष म्हणजे विरोधकांना पंतप्रधानांवर टीका करण्याची चांगली संधी मिळाली.

राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर नोटबंदीच्या निर्णयाची आठवण करुन दिली. सोशल मीडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणातच केली होती. म्हणजे विचार न करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असले का? असा सवाल केला. सपाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तर अनेक सल्ले दिले. ‘सामाजिक संवादाचे रस्ते बंद करण्याचा विचार करणं योग्य गोष्ट नाही. सोडण्यासाठी अनेक गोष्टी आहेत साहेब. जसा सत्तेचा मोह, विद्वेषाच्या राजनितीचा विचार, मन-मर्जी करण्याच्या गोष्टी, निवडक मीडियाशी विचारलेले तुमच्या आवडीचे प्रश्न आणि विश्व विहार. कृपया या गोष्टींवर विचार करा. असा सल्ला दिला. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली. तुम्ही त्या ट्रोलर्सच्या फौजेला हा सल्ला द्या, जे तुमच्या नावाने दर सेकंदाला अपशब्दांचा वापर करत धमक्या देतात. अशा विविध प्रतिक्रिया उमटल्या त्यामुळे दिवसभर हीच चर्चा सुरु होती.

पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह भाजपने २०१४ मध्ये सोशल मीडियाचा वापर करुन भाजपचा चांगलाच प्रचार केला होता. त्याला त्यांना फायदाही झाला होता. विशेष म्हणजे त्यांना २०१४ ची निवडणूक जिंकता आली होती. विशेष म्हणजे ट्वीटरवर सर्वाधिक फॉलो करणाऱ्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे राजकीय नेते आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेमुळे त्यांचे असंख्य फोलोअर्स बूचकाळ्यात पडले होते. परंतु यू टर्नमुळे काही प्रमाणात त्यांना दिलासा मिळाला आहे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments