Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना फडणवीसांनी दिले ‘हे’ आव्हान!

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना फडणवीसांनी दिले ‘हे’ आव्हान!

Shiv Sena changes role for power: Devendra Fadnavis

मुंबई : मुस्लिम आरक्षणासंदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या विधानानंतर विरोधकांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडले. धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम आरक्षणाला आमचा विरोध असून मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही, हे हिंमतीने सांगा, असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज मंगळवारी दिलं.

मुस्लिम आरक्षणावर प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर विचार होईल. मुस्लिम आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप सरकारपुढं आलेला नाही. त्यामुळं त्यावर निर्णय होण्याचा प्रश्न नाही. विरोधकांनी त्यावरून आदळआपट करू नये,या शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांना खडसावले होते. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिलं. शिवसेनेने मुस्लिम आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात येऊन मुस्लिमांना आरक्षण देऊ शकत नाही, असं हिंमतीने सांगावं, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. सरकार येऊन १०० दिवस झाले तरी आघाडीतील घटक पक्ष एकमेकांना समजावू शकलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments