Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसरकार ‘नेम चेंजरच’!

सरकार ‘नेम चेंजरच’!

भाजपाच्या केंद्र सरकारने काँग्रेस सरकारच्या काळातील योजनांचे नावं बदलून योजना चालवण्याचे काम करत आहे. हे सरकार “गेम चेंजर नव्हे तर नेम चेंजर” आहे अशी टीका राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते आणि गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारवर केली. परंतु पंतप्रधान मोदींना हे मान्य नाही ते म्हणतात हे सरकार “नेम चेंजर नसून एम जेंजर” आहे. खरतर पंतप्रधानांच्या विधानांवर कुणालाही विश्वास नाही. मोदी लोकसभा आणि राज्यसभेत बोलत होते त्यावेळी विरोधकांनी बंद करो बंद करो जुमले बाजी बंद करो, नही चलेगी नही चलेगी जुमले बाजी नही चलेगी अशा घोषणा लावल्या. १५ लाख रुपयांचे काय झाले. एक कोटी नोकऱ्यांचे काय झाले असे अनेक प्रश्न विचारले. मोदी उत्तर दया असा प्रश्न उपस्थित करत मोदींना धारेवर धरले. परंतु मोदींनी याचे उत्तर देण्याचे टाळले. काँग्रेसमध्ये कोणत्या नेत्यांनी काय केले याचा पाढा वाचत बसले. राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये काँग्रेसला प्रश्न विचारण्या ऐवजी राफेल करार, शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार निर्मिती यांची उत्तरे द्यावीत. २०१४ पूर्वी मोदी हे काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कार्यकाळाविषयी बोलत होते. आता मोदी सरकार चार वर्षांपासून सत्तेत आहे. संसदेतून जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ते अजूनही विरोधकांनाच प्रश्न विचारत आहेत. कारण विकासात्मक काम केली नसल्यामुळे  जनतेच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यायला काहीच नाही. मोदींना आज जो अनुभव आला तो कधीही आला नसेल कारण त्यांच्या भाषणाच्या वेळी विरोधकांनी सतेच त्यांच्या सोबत असलेला तेलुगू देशमच्या खासदारांनीही घोषणाबाजी केली. याचाच अर्थ सत्तेतील पक्ष सरकारच्या कामकाजावर खूश नाही. केंद्र सरकारचे सर्वच मंत्री बोलबच्चन आहे. खरतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषदही कधी घेत नाही. मन की बात या कार्यक्रमातून त्यांना जे बोलायच ते बोलून मोकळे होऊन जातात. परंतु पत्रकार परिषद घेऊन कधीही पत्रकारांशी संवाद साधत नाही. मोदींची हीच कमकुवक बाजू आहे. मोदी सरकारने काँग्रेस सरकारच्या काळातील योजनांची नावे बदलून सर्व योजना सुरु ठेवल्या आहेत. सरकारच्या कामकाजावर आज सर्वच क्षेत्रातील मंडळी नाराज आहे. जनतेला विकास हवा आहे. परंतु सरकार करुन जी माहिती दिली जाते. भाषणबाजी केली जाते ती हास्यास्पदच आहे. सरकारने खरोखरच नेम चेंजरच आहे. हे आता पर्यंतच्या कामकाजावरुन दिसून येते.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments