Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयभैय्यूजी महाराजांच्या सहकाऱ्यांची धरपकड : बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत

भैय्यूजी महाराजांच्या सहकाऱ्यांची धरपकड : बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत

भैय्यूजी महाराज उदयसिंह देशमुख म्हणून एका जमीनदार शेतकरी कुटुंबात जन्माला आले आणि तरुणपणात त्यांनी व्यावसायिक मॉडेल म्हणून देखील काम केले. त्यांनी ग्लॅमरपासून ते अध्यात्मिक जगतापर्यत आपला ठसा उमटवला. आणि एके दिवशी अचानक त्यांनी स्वत: ला संपवले. लोकांनी त्याच्या मृत्यूबद्दल अनेक कयास व्यक्त केलेत. त्यांच्या बद्दल अनेकअफवा पसरवल्या गेल्या कारण त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केले होते. काही प्रसारमाध्यमांनी असेही लिहिले की,  दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीपासून असलेल्या त्यांच्या मुलीमध्ये सतत वादविवाद  होत असत , त्यामुळे कौटुंबिक संघर्षांतील तणावामुळे महाराज आत्महत्येस प्रवूत्त झाले असेही कयास वर्तवले गेलेत. २०१५ मध्ये त्यांची पहिली पत्नी मरण पावली आणि त्या पत्नीपासून त्यांना एक मुलगी आहे. २०१७ मध्ये त्यांनी आयुषी शर्माशी लग्न केले आयुषी पासून त्यांना धारा नावाची आठ महिन्यांची मुलगी देखील आहे.

विनायक दुधाडे आणि शरद देशमुख हे दोन सहकारी त्यांच्या खूप निकट होते. भैय्युजींच्या पालकांची सेवा करून विनायकने त्यांचा आदर अर्जित केला होता. महाराजांच्या अनुपस्थितीत, विनायक घरी त्यांच्या पालकांची काळजी घेत असे. वैयक्तिक आणि व्यावसायिक  पातळीवर  विनायक महाराजांचे सर्व व्यवहार सांभाळत असे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर, आयुषी आणि पलक ह्या दोन मुली वेगवेगळ्या हुद्यांवर आश्रमामध्ये काम करत होत्या. महाराजांनी प्रथम जाहीर केले की ते संसारिक जीवनापासून संन्यास घेणार आहेत आणि एके दिवशी अचानक त्यांनी आयुषीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

या घटनेमुळे त्यांचा सहकारी विनायक व्यथित झाला कारण पलक पुराणिक विनायकच्या माध्यमातून आश्रमात दाखल झालेली होती आणि भय्यूजीची तिच्याशी असलेल्या तथाकथित निकटतेसंबंधी त्याने गैरसमज करून घेतला होता. विनायक आणि शरद देशमुख यांना भय्युजींची पत्नी पलक व्हावी अशी इच्छा होती जेणेकरून ते तिच्या माध्यमातून सर्व काही नियंत्रित करू शकतील. परंतु दरम्यान, भय्यूजींनी आयुषीला त्यांची पत्नी म्हणून निवडले आणि ते त्यांच्या सहायकांच्या डोळ्यात खुपायला लागले. त्यांनी कटकारस्थान सुरू केले , भैय्यूजी त्यांच्या पित्यांच्या आणि पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आलेल्या तणाव आणि नैराश्याला दूर करण्यासाठी औषधे घेत असतं , महाराजांना गुंगीत ठेवण्यासाठी औषधांचा ओव्हर डोस देण्यात येत असे. अशा परिस्थितीतही जेव्हा त्यांनी आपल्या इच्छेनुसार लग्न केले,तेव्हा त्यांना  ब्लॅकमेलिंग करणे सुरु केले गेले.

25 वर्षीय पलक पुराणिक तिच्याशी लग्न करण्यास भय्यूजींवर दबाव टाकत होती. काही शिष्यांनी असा दावा केला आहे की महाराज दोन्ही मुलींशी संबंध ठेवून होते आणि त्यांच्यापैकी एकीने तिच्या फायद्यासाठी काही आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. काही म्हणतात की ते व्हिडिओ खोटे आहेत. त्या व्हिडीओंबद्दल अनेक अंदाज बांधल्या गेलेत मात्र ते व्हिडिओच त्यांच्या आत्महत्येचे कारण मानले जात आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. गुंगीत ठेवण्यासाठी औषधांचे ओव्हर डोस “गुप्तपणे” दिल्या गेले होते. पलक पुराणिक महाराजांचे वैयक्तिक सचिव होती तर विनायक दुधडे (४२)आणि शरद देशमुख (३४) वैयक्तिक सहकारी होते आणि या तिघांनाही महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी अटक करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण एका खंडणी कॉल मुळे उघडकीस आले.  त्या कॉलने भैय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणाच्या तपासणीस एक नवीन दिशा मिळाली. तपासणी दरम्यान, भय्यूजी महाराजांच्या ट्रस्टशी संबंधित वकीलाला ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्या संबंधित फोन आला. पोलिसांनी नंबरची तपासणी सुरू केली . त्या फोन नंबरने तपासणीची सूत्रे भय्यूजी महाराजांच्या चालकाकडे वळवली. त्याने दिलेली माहिती त्या आत्महत्या प्रकरणात सुरू असलेल्या तपासणीपासून पूर्णपणे भिन्न होती. ड्रायवरने सांगितले कि भैय्यूजींच्या आत्महत्ये नंतर काही दिवसांनी त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि त्यांच्या ट्रस्टच्या स्वयंसेवकांमध्ये काही वादविवाद झालेत.

ड्रायवरच्या स्टेटमेंटच्या आधारे इंदोर पोलिसांनी १२५ लोकांचे जवाब घेतलेत आणि २८ जणांची  अधिकृत स्टेटमेंट घेतलीत. त्या विधानांच्या आधारे आणि डिजिटल पुराव्यांच्याआधारावर (फोन कॉल रेकॉर्ड आणि जुन्या चॅट्स) पोलिसांनी विनायक, शरद आणि पलक यांना अटक केली. पलककडे महाराज आणि तिच्या चॅटचे काही आक्षेपार्ह स्क्रीन शॉट्स होते ज्याआधारे ती त्यांना ब्लॅकमेल करीत होती. त्यांचे वैयक्तिक सचिव म्हणून  भय्यूजी महाराजांचे फोन नेहमी विनायक आणि पलक यांच्या ताब्यात राहायचे त्यामुळे अशी शक्यता आहे कि त्यां दोघानीच ह्या चॅट्सची देवाण घेवाण करून ब्लॅकमेल करण्याचा त्यांचा हेतू होता.

जर भैय्यूजी महाराजांनी चॅटिंग केली नाही तर अशा सामर्थ्यशाली माणसाला त्याच्या सहायकांनी   ब्लॅकमेल कसे केले , ते पोलिसांची मदत घेऊ शकले असते. एप्रिल 2018 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील मध्यप्रदेश सरकारने त्यांना नर्मदा नदीच्या संरक्षणासाठी स्थापन झालेल्या समितीच्या सदस्यांमध्ये समाविष्ट केल्यानंतर राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली. तथापि, भय्यूजीनी कोणत्याही विशिष्ट पक्ष किंवा जातीधर्माकडे झुकाव असणारी हि ऑफर नाकारली. अनेक लोकांचे  त्यांच्यावर प्रेम होते आणि संपूर्ण आरोपांमध्ये जर ते निर्दोष होते तर संपूर्ण सरकार आणि पोलिस त्यांच्या दिमतीला होते. पलक ही एकमेव मुलगी नाही, जीने भय्यूजी महाराजांशी अवैध संबंध असल्याचे आरोप केले. महाराज जेव्हा विवादात आले आणि यावेळी परिस्थती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. हा तोच विनायक आहे ज्याच्या बदल भय्युजींनी त्यांच्या आत्महत्या पत्रात नमूद केले होते कि त्यांच्या पाश्च्यात संपत्तीची देखभाल त्यास करू द्यावी.

पलक शिष्य म्हणून आश्रमामध्ये दाखल झाल्यानंतर विनायक दुधाडे आणि ड्रायव्हर शरद देशमुख ह्यांचा तिला महाराजांच्या निकट आणण्यात जवळचा  हात आहे. महाराज आणि तिच्यातील चॅट त्यांच्या नियोजन आणि विवाहाच्या संभाव्यतेबद्दल सूचित करतात. तथापि आरोप प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण आणखी अवघड झाले.

महाराज त्यांच्या प्रसिद्ध राजकारणीं अनुयायांमध्ये ‘राष्ट्रसंत ‘ म्हणून संबोधले जात असत. उदयसिंह देशमुख उर्फ ​​भैय्यूजी
महाराज मूळ मध्य प्रदेशातील शुजालपूरचे होते. ब्रान्डेड घड्याळे, पॉश कार आणि अलिशान निवासस्थाने अश्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीसाठी ते प्रसिद्ध होते. आपल्या विशाल आश्रमाव्यतिरिक्त ते विविध शैक्षणिक संस्था चालवत असत. आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या जीवनातील अनेक वादळे उघडकीस आली . कॉंग्रेसने त्याच्या मृत्यूनंतर सीबीआय चौकशीची मागणी केली. अखेरीस पोलिस काही निष्कर्षापर्यंत पोहचले परंतु तरीही  या तपासणीतील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि त्यांचे उत्तर भैय्यूजी महाराजाच देऊ शकले असते.

 

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments