Friday, May 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख….तो भी टांग उपर!

….तो भी टांग उपर!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल आला आणि भाजपाने आमचेच सर्वात जास्त सरपंच निवडूण आलेत असे ढोल बदडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले. काँग्रेस,राष्ट्रवादीनेही भाजपाचा दावा पोकळ असल्याचे स्पष्ट केले.भाजपा किती धादांत खोटे बोलत आहेत हे समारे आणले.ग्रांमपंचायतच्या निवडणूका ह्या पक्षपातळीवर होत नाही.पक्षाच्या निवडणूक चिन्हांवर लढवल्या जात नाही त्यामुळे आमच्याच पक्षाचे सरपंच आले असा दावा करणे चुकीचे आहे. सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणात ग्रांमपचायतीच्या निकालावर चर्चा घडली. लोकसभेच्या निवडणुका होऊन साडेतीन वर्षे झाली. विधानसभेच्या निवडणुका होऊन आता तीन वर्षे होतील. तेव्हा लोकांनी धूमधडाक्यात सत्तापरिवर्तन केले. त्यानंतर दोन्ही सरकारांनी धाडसी निर्णय घेतले. त्याचे काहींनी समाधान मानले तर काहींनी त्रागा केला. अशा सर्व गोंधळाताच १६ जिल्ह्यांतील तीन हजार १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सरपंचांची निवडणूक पहिल्यांदाच जनतेतून; तीही थेट पद्धतीने होणार असल्याने या निवडणुकीवर लक्ष केंद्रित होणे स्वाभाविकच होते. तसे ते झाले. निवडणुकीचे निकाल लागले आणि सगळ्याच पक्षांनी आमचाच विजय झाल्याचे ढोल वाजविणे सुरू केले. भाजपच्या आयटी सेलने अती घाई केली. खरतर अती घाई अपघाताला निमंत्रण देई असे फलक आपण हायवे,वर्दळीच्या रस्त्यांवर बघतो. तशीच घाई भाजपाने आकडेवारी घोषित करुन टाकली. परंतु त्यांचे कोणते उमेदवार होते हे स्पष्टपणे सांगितले नाही. पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला निर्विवाद यश मिळाल्याची घोषणा केली. इतरही पक्ष गणितांच्या लढाईत उतरले. प्रत्यक्षात कुठल्याच पक्षाने अधिकृत यादी जाहीर केली नाही. असे पहिल्यांदा झालेले नाही. याआधीही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांवर राजकीय पक्ष हक्क सांगत. मुळात ग्रामपंचायत निवडणुका पक्ष म्हणून होत नाहीत. तिथे पक्षाचे चिन्हही नसते. ती कधी कधी एकाच पक्षाच्या दोन गटांमध्ये होते. तेथील निवडणुकीचे मुद्देही खूप स्थानिक असतात. ते एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे तेथील राजकारणाचे पक्षीय संबंध ही बाब नेहेमी धूसर असते. ग्रामपंचातीच्या निवडणूकांकडे विधानसभा,लोकसभेच्या दृष्टीकोनातून बघितले जाते. परंतु ग्रामपंचातच्या मतदानाच्या वेळी गावातील वेगळे मुद्दे असतात. तर विधानसभा,लोकसभा निवडणूकांचे वेगळे मुद्दे असतात. सध्या जर राज्यातील आणि देशातील विचार केला तर नागरिकांमध्ये एक नाराजी आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापारी वस्तू सेवा करांमुळे त्रस्त आहेत. बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली. नवीन रोजगार नाही. सर्वत्र आर्थिक मंदीचा फटका बसलेला असतांना आमचाच विजय झाला,आम्हालाच जास्त जागा मिळाल्या असा दावा करणे हा खोटारडेपणाच! तरी सुध्दा ‘गीरे भी तो टांग उपर’ अशी गत सत्ताधाऱ्यांच्या झाली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments