Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeपाककलासोपा व रुचकर नाष्टा कसा असावा

सोपा व रुचकर नाष्टा कसा असावा

संगीता अमलाडी, निसर्गोपचारतज्ञ, नैसर्गिक आहारतज्ञ, नैसर्गिक उपायतज्ञ, योगशिक्षिका

1. गाजर व रताळ्यांचे काप

2. बदामी आंब्याच्या साली व थोड दूध घालून मिक्सरमध्ये वाटून पौष्टिक पेय.

1 कृति

रताळं व गाजर यांचे जरा जाडसर काप करायचे.

त्याना मीठ, हिंग, हळद, जरा लाल तिखट लावून मिश्रण हलवायचे.

मग त्यात जरासे उडदाचे पीठ घालून व्यवस्थित मिश्रण करायचे.

व त्याला भाजलेला बारीक रवा लावून तव्यावर साजुक तुपावर भाजायचे. परतून झाल्यानंतर जरा वेळाने तव्याच्या बाजूने जरा से पाणी शिंपडून झाकून ठेवायचे.

मत मस्त चविष्ट व पौष्टिक काप तयार होतात.

2 कृती मी मागे पपई च्या साली मी जरा दूध घालून मिक्सरमध्ये वाटून पौष्टिक पेय घेते. म्हणून फोटो व कृती पाठवली होती.

आज मी बदामी आंब्याच्या साली पण तसेच वाटून घेतल्या व त्यात आंब्याच्या बाटाला लागलेला आंबा पण पाणी घालून कुस्करून आमरस करून यो पण घातला.व मस्त गोडपणा आला.

व मी आता आंब्याच्या साली पण चोखून खायच्या ऐवजी त्या पण वाटून घेत जाईन.

याबद्दल पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या पतीना जेंव्हा पार्किन्सनच्या औषधाच्या महाविषाने संपूर्ण आरोग्य गेले होते तेंव्हा त्यांना भरपूर फलाहार… गाजराचा रस इत्यादि खूप द्यायची.

व त्यांना इतर लोकांना काय त्रास होतात ते झाले नाही. ते झोंप असे नव्हते.व मनाने खूप जागरूक होते.क्रिकेट… केबीसी, इत्यादि सगळे आवडीने बघायचे.बोलणं कमी असले तरी त्रास असा नव्हता.
ते झोपेतच गेले.

व त्यानंतर मी कावळ्याना फलाहार द्यायला लागले. व मला आंबा वगैरे खायला मनच होत नसायचं. पण त्याना व मुलालाही मी सप्टेंबरपर्यंत आंबे द्यायची.

व माझा मुलगाही गेल्यानंतर तर मी गेली दोन वर्षे कावळ्याना जास्तच फलाहार द्यायला लागले आहे.

व मला तेवढी फळं खाववतच नाही.

मग मी असले प्रयोग करायला लागले.

व मला नैसर्गिक आहार म्हणजे कसाही चालतो!!!

तरी आपण पण हे करून पहावं. फक्त बदामी आंब्याच्या साली… व पपई च्या साली असे वाटून घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments