Tuesday, June 16, 2026
Homeकोंकणठाणेघोडबंदर रोड आणि मुंब्र्यात शुक्रवारी पाणी पुरवटा नाही

घोडबंदर रोड आणि मुंब्र्यात शुक्रवारी पाणी पुरवटा नाही

mumbra, thane, ghodbunder road, no water supply, mumbra thaneठाणे: ठाणे महानगरपालिका स्टेम प्राधिकरण यांचेमार्फत होणारा पाणीपुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवार दिनांक 12.06.2020 रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शुक्रवार दिनांक 12.03.2020 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा व मुंब्रा इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहील. तसेच रात्री 9.00 ते शनिवार सकाळी 9.00 वाजेपर्यत ‍सिध्देश्वर तलाव, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी, जेलपरिसर, साकेत, ऋतुपार्क इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दोन दिवस कमी दाबान पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उपनगर अभियंता, पाणीपुरवठाविभाग, ठामपा यांनी केले आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
मुंबई माणूस या मराठी डिजिटल न्यूज पोर्टलच्या एकूण संपादकीय व्यवस्थापन, सामग्री धोरण, प्रकाशन प्रक्रिया, दर्जा नियंत्रण आणि प्लॅटफॉर्म संचालनाची जबाबदारी प्रशासक खाते सांभाळते. विश्वासार्ह, जनकेंद्री आणि निष्पक्ष पत्रकारिता सुनिश्चित करणे हे या खात्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments