कोहळ्याच्या वड्या: प्रोटीन,कार्बोहायड्रेट्स तसेच व्हिटामिमन्स असलेल्या कोळ्याच्या वड्या हा मराठमोळा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे.
जिन्नस
- ५०० ग्रॅम कोहळ्याचा कीस
- २ नारळ
- ३ वाट्या साखर
- १ वाटी पिठी साखर
- एक चमचा तूप
- १ वाटी साय किंवा खवा
पाककृती
कोहळ्याचा किस वाफवून घ्यावा. नारळ खरवडून मिक्सरमध्ये बारीक वाटावा.
एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्याला तूपाचा हात फिरवावा. त्यात नारळ, कीस, साधी साखर व साय किंवा कुस्करलेला खवा घालावा.
चुलीवर ठेवून मंद आंचेवर ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होऊन कडेने सुटायला लागले की पिठी साखर घालून एकदोन मिनिटे चुलीवर ढवळावे.
खाली उतरवून मिश्रण कोमटसर होईपर्यंत घोटावे.
तूपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतावे व पृष्ठभाग गुळगुळीत करावा. नंतर निवाल्यावर वड्या कापाव्या.