Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनस्टार रेसलर जॉन सीनाही बिग बॉस स्पर्धेक आसिमचा चाहता

स्टार रेसलर जॉन सीनाही बिग बॉस स्पर्धेक आसिमचा चाहता

Asim Riaz John Cena,Asim Riaz, John Cena,Asim, Riaz, John, Cenaमुंबई : बिग बॉस १३ चा स्पर्धक अभिनेता आसिम रियाजला देश विदेशातून वाढता पाठिंबा मिळत आहे. अंतिम सोहळ्याला आता फक्त १० दिवस उरले आहेत. अनेक बडे सेलिब्रिटी आसिमला पाठिंबा देताना दिसतात. आता यात WWE स्टार रेसलर आणि जगप्रसिद्ध सेलिब्रिटी जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्रां अकाउंटवरून आसिम रियाजचा फोटो शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

जॉनने हा फोटो शेअर करताच जॉन सीनाही आसिमचा चाहता असल्याचं चाहत्यांनी मानलं आहे. यापूर्वीही जॉनने इतरांचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे जेव्हा तो त्याच्या चाहत्यांचे किंवा इतरांचे फोटो शेअर करतो तेव्हा जॉन त्या फोटोला कोणतंही कॅप्शन देत नाही. एका मुलाखतीत जॉनने अशा पोस्ट टाकण्यामागचं कारण सांगितलं होतं.

जॉन म्हणाला होता की, प्रत्येक फोटो त्याच्यासाठी प्रेरणादायी आहे. यापूर्वी जॉन सीनाने शाहरुख खान, रणवीर कपूर, सुशांत सिंग राजपूत आणि विराट कोहली यांचे फोटोही शेअर केले आहेत. स्पर्धक हा शो जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. बिग बॉसच्या घराबाहेरही चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सना जिंकवण्याचे प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments