Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेश‘या’ अभिनेत्याच्या घरात सापडल्या नोटांच्या बॅग आयकरचा छापा!

‘या’ अभिनेत्याच्या घरात सापडल्या नोटांच्या बॅग आयकरचा छापा!

Vijay Income Tax raid,Vijay, Income Tax raid,Vijay IT raid,IT raid,raid,Vijay raid,Vijay Tax raid,Income Taxबंगळुरु : दक्षिणेतील सुपरस्टार विजयवर आयकर चोरीच्या प्रकरणी घरावर आयकरने धाड टाकली. विजयच्या घरामध्ये खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅग आढळून आल्या. त्यावेळी विजय तामिळनाडूतील नेयवली कोलसा खाणीत त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता.

छापेमारीमुळे विजयला शूटिंग अर्धवट सोडून घरी परतावं लागलं. एजीएस एंटरप्रायजेस या कंपनीवरील छापेमारीदरम्यान, सुपरस्टार विजयला बिजली या सिनेमासाठी दिलेल्या पैशांवरुन गडबड झाल्याचं आढळलं. त्याबाबत आयकर विभागाने अधिक चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विजयला या सिनेमासाठी मोठी रक्कम मिळाल्याची कुणकुण आधीच आयकर विभागाला लागली होती. त्याआधी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी विजयच्या फायनान्सच्या घरातून पैशाच्या बॅग जप्त केल्या. खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने बुधवारी ५ फेब्रुवारीला विजयच्या शालीग्राम आणि पनैयूर इथल्या घरांवर धाडी टाकल्या. त्या धाडी आज पुन्हा सुरु केल्या. विजय करचोरी करु शकत नाही, असा दावा त्याचे फॅन्स करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments