Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
HomeमनोरंजनVideo : शाहरुख म्हणाला, माझी बायको हिंदू,मी मुस्लिम, माझी मुलं हिंदुस्तानी!

Video : शाहरुख म्हणाला, माझी बायको हिंदू,मी मुस्लिम, माझी मुलं हिंदुस्तानी!

Shahrukh Khan Family,Shahrukh, Khan, Family,Shahrukh Khan,srkमुंबई : सध्या देशभरात CAA – NRC वरून वाद सुरु आहे. मात्र, बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने मोठं विधानं केलं. शाहरुख नुकताच डान्स प्लस या रिअॅलिटी शोमध्ये गेला होता. शाहरुख यावेळी म्हणाला की, ‘आम्ही घरात कधीही हिंदू- मुस्लिम या विषयावर बोलत नाही. माझी बायको हिंदू आहे आणि मी मुस्लिम आणि माझी मुलं हिंदुस्तानी आहेत. असं शाहरुख खान याने सांगितले.

शाहरुखच्या तोंडून हे वाक्य ऐकून सारेच भारावून गेले आणि त्याच्या या वाक्याला टाळ्यांनी दाद दिली. ज्यावरून सर्वच स्थरावर त्याचं कौतुक होत आहे. शाहरुख पुढे म्हणाला की, ‘सुहाना जेव्हा लहान होती तेव्हा तिला शाळेचा एक फॉर्म भरायचा होता. त्यात धर्म लिहायचा होता. तिने मला आपला धर्म कोणता असा प्रश्न विचारला तेव्हा मी तिला आपण भारतीय आहोत असंच उत्तर दिलं. कोणताही धर्म नाही आणि असूनही नये असं मला वाटतं.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments