Tuesday, December 3, 2024
Homeविदर्भभंडाराभंडारा आग प्रकरण: 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 10 नवजात...

भंडारा आग प्रकरण: 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 10 नवजात बालकांचा झाला होता मृत्यू!

two-nurses-booked-for-negligence-in-bhandara-hospital-fire-tragedy
two-nurses-booked-for-negligence-in-bhandara-hospital-fire-tragedy

भंडारा: 9 जानेवारीला भंडारा जिल्हा हॉस्पिटलच्या न्यूबॉर्न केअर यूनिटमध्ये आग लागली होती. यात झालेल्या 10 नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिस स्टेशनमध्ये नर्स शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके यांच्या विरोधात IPC च्या कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग लागल्याच्या 12 मिनिटांपर्यंत वार्डमध्ये पोहोचल्या नव्हत्या नर्स
भंडारा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यांच्या तपासात समोर आले आहे की, SNCU मध्ये आग लागल्याच्या 12 मिनिटपर्यंत नर्स तिथे पोहोचल्या नव्हत्या. मुंबईच्या कालीन येथील फॉरेंसिक लॅबद्वारे SNCU चे CCTV DVR च्या तपासात हा खुलासा झाला आहे. घटना घडली तेव्हा दोन्ही नर्स कुठे होत्या याचा तपास अद्यापही सुरू आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 9 जानेवारीला मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात आग लागली होती. या आगीमध्ये 10 नवजात बाकांचा होरपळून मृत्यू झाला होता. यूनिटमधून सात बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. कक्षामधून सात बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.

बाळांचे शरीर काळे पडले होते
आगीनंतर वार्डमधील बाळांचे शरीर काळे पडले होते. या कक्षात काळा धूर दिर्घकाळ होता. या घटनेमधील निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण मुलांच्या कक्षाचा दरवाजा उघडला तेव्हा यात कोणताही स्टाफ नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments