Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी चक्क काळतोंडी माकड!

ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी चक्क काळतोंडी माकड!

Donald Trump Security Langurs,Donald Trump, Security LangursDonald, Trump, Security, Langursआग्रा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२४ फेब्रुवारी) रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर ट्रम्प सपत्नीक आग्र्याचा ताज महाल पाहण्यासाठी जाणार आहेत. आग्रा येथे माकडांचा उच्छाद हा सुरक्षायंत्रणांचा काळजीचा विषय ठरला आहे. आग्रा येथील मार्गावरील माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी चक्क पाच माकडांना (लंगूर) तैनात करण्यात आलं आहे. मात्र, या विषयाचीच जोरदार चर्चा सुरु आहे.

ट्रम्प यांच्या दौ-यामुळे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत ट्रम्प अहमदाबादमध्ये असणार तोपर्यंत त्यांच्या कार्यक्रम स्थळाच्या आसपास नो फ्लाईंग झोन असणार आहे. एवढेच नाहीतर विशेष हॅलिकॉप्टरद्वारे संपूर्ण भागावर देखील नजर ठेवली जाणार आहे.

ट्रम्प सपत्नीक आग्र्याचा ताज महाल पाहण्यासाठी जाणार आहेत. विशेष म्हणजे आग्रा परिसरात माकडांचा सुळसुळाट अधिक आहे. या माकडांना दूर ठेवण्यासाठी लंगूर काळतोंडी वानरं विशिष्ट अंतरावर ठेवले जातील.

अशी राहणार सिक्युरिटी…

ट्रम्प अहमदाबादमध्ये असणार तोपर्यंत त्यांच्या कार्यक्रम स्थळाच्या आसपास नो फ्लाईंग झोन असणार आहे. एवढेच नाहीतर विशेष हॅलिकॉप्टरद्वारे संपूर्ण भागावर देखील नजर ठेवली जाणार आहे. मोटेरो स्टेडिअमधील कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची वैयक्तिक तपासणी होणार आहे. या परिसरात पोलिसांच्या वाहनांशिवाय अन्य कोणत्याही वाहनास प्रवेश नसणार.

भारतात दाखल झाल्यानंतर ट्रम्प यांच्याभोवती थ्री-लेयर हाय सिक्युरिटी तैनात असेल. सर्वात आधी अमेरिकेचे सीक्रेट सर्विस एजंटस, त्यांच्यापाठोपाठ एसपीजी आणि सर्वात शेवटी अहमदाबाद पोलीस विभागाचा ताफा असेल. तब्बल दहा हजार पोलीस कर्मचारी ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणार आहेत. ज्यामध्ये २५ आय़पीएस, ६५ एसीपी, पोलीस निरीक्षक, ८०० पोलीस उपनिरीक्षकसह पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. याशिवाय हवाई सुरक्षा व्यवस्थेत सात विमानांचा ताफा देखील असणार आहे. यामध्ये एक अमेरिकन हवाईदलाच्या विशेष विमानांशिवाय काही हॅलिकॉप्टर देखील असणार आहेत, ज्यामध्ये कार आणि कार्गो देखील असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments