Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनकिआरा आडवाणीची टॉपलेस पोज, फोटोशूटची चक्क कॉपी

किआरा आडवाणीची टॉपलेस पोज, फोटोशूटची चक्क कॉपी

Kiara Advani Dabboo Ratnani,Kiara Advani, Dabboo Ratnani,Kiara, Advani, Dabboo, Ratnaniफेमस फॅशन फोटोग्राफर डब्बू रतनानीने आपला एनुअल सेलिब्रिटी कॅलेंडर लॉन्च केले. या कॅलेंडरमध्ये त्याने १४ सेलिब्रिटींना जागा दिली आहे आणि त्यांचे एकापेक्षा एक फोटो कॅप्चर केले. पण २५ वर्षांपासून फोटोग्राफीमध्ये सक्रिय असलेल्या डब्बू रतनानीच्या कामावर सोशल मीडियावर प्रश्न निर्माण केले जात आहे. २०२० कॅलेंडरसाठी त्याने किआरा आडवाणीचे जे फोटोशूट केले आहे, ते एका इंटरनॅशनल फोटोग्राफरच्या फोटोशूटची नक्कल असल्याचे सांगितले जात आहे.


सोशल मीडिया यूजरने हे दिले पुरावे…

डब्बूचे कॅलेंडर समोर येताच एका सोशल मीडिया यूजरने सोशल मीडिया हँडलवर काही स्क्रीनशॉट शेअर केले आणि किआराची पोज इंटरनॅशनल फोटोग्राफर मेरी बार्स्चच्या फोटोशूटची कॉपी असल्याचे म्हणले आहे. यानंतर मेरी बार्स्चनेही आपल्या इंस्टाग्राम हँडलवर स्क्रीनशॉट शेअर करून नाराजी व्यक्त केली अनिमा लिहिले, मी हे इथेच सोडते. याव्यतिरिक्त मेरीने आणखी काही फोटोदेखील शेअर केले, ज्यामध्ये यूजर्सने डब्बूच्या फोटोशूटची खिल्ली उडवत कमेंट केल्या आहेत.

किआराने केले आहे टॉपलेस फोटोशूट…

डब्बूसाठी किआराच्या ज्या पोजची चर्चा होत आहे, त्यामध्ये ती झाडांच्या पानांमध्ये टॉपलेस उभी असलेली दिसत आहे. तिने स्वतःला एका पानाने कव्हर केले आहे. अगदी अशीच पोज मेरीने आपल्या फोटोशूटसाठी केली आहे. किआराच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे तर ती ‘शेरशाह’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments