Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील भाजपचे ‘हे’ नाराज नेते दिल्लीत बॅटींग करणार!

महाराष्ट्रातील भाजपचे ‘हे’ नाराज नेते दिल्लीत बॅटींग करणार!

Pankaja Munde Vinod Tawde,Pankaja Munde, Vinod Tawde,Pankaja, Munde, Vinod, Tawde

मुंबई : दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी दिल्ली भाजपने महाराष्ट्र भाजपची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील १० भाजप नेते दिल्ली विधानसभेतील २५ मतदारंसघासाठी प्रचार करणात आहेत. मात्र, भाजपचे नाराज नेते माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, खासदार रक्षा खडसे, पूनम महाजन यांचाही समावेश आहे. हे नेते भाजपसाठी प्रचार करताना दिसणार आहेत.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. ७० पैकी २५ मतदारसंघात महाराष्ट्रातील १० नेते प्रचारासाठी जाणार आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. पंकजा मुंडेंप्रमाणेंच खडसेंच्या नाराजीला शांत करण्यासाठी त्यांच्या स्नुषेचा ‘मिशन दिल्ली’त समावेश केल्याचं बोललं जातं. त्यांच्यासोबतच तिकीट नाकारलेले माजी मंत्री विनोद तावडे यांचाही समावेश आहे. तर मंत्रीपद न मिळालेल्या खासदार पूनम महाजन यांचाही समावेश आहे.

दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान; ११ फेब्रुवारीला निकाल…

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे मागच्या वेळी आपने दिल्लीत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु भाजपने यंदा ही सत्ता हिसकून घेण्यासाठी देशातील संपूर्ण भाजपची फौज कामाला लावली आहे. यामध्ये भाजपचे नेते वादग्रस्त विधान करुन, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments