Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसे सुपारी घेऊन काम करते; शिवसेनेचा आरोप

मनसे सुपारी घेऊन काम करते; शिवसेनेचा आरोप

मुंबई : आम्ही रंग बदलून सत्तेत जात नसतो, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. शिवसेनेकडून त्याला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेनं आपला भगवा झेंडा बदलला नाही. मनसे प्रमाणे आम्ही सुपारी घेऊन काम करत नाही असा टोला शिवसेना नेते ना. अनिल परब यांनी लगावला आहे.

मनसेचं २३ जानेवारी रोजी गोरेगाव येथे महाअधिवेशन संपन्न झालं. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मी रंग बदला नाही आणि अंतरंग सुध्दा बदलला नाही. हे उध्दव ठाकरेंनी आधीच जाहीर केलं आहे असं ना.अनिल परब यांनी सांगितलं. शिवसेनेला बदनाम करण्याचे मनसेनं ठेका घेतला आहे असा टोला ना. परब यांनी लगावला.

शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आधी मनसेनं काँग्रेसकडून सुपारी घेतली होती. आता मनसेनं भाजपकडून सुपारी घेतली आहे. शिवसेना कधीच मनसे प्रमाणे सुपारी घेऊन काम करत नाही असंही ना. परब यांनी सांगितलं. राज ठाकरे  यांनी सुपारी घेऊन काम करण्यापेक्षा स्वत:साठी काम करावे. शिवसेनेनं जे कामे केलीत ती ठोकून आणि दिवसा ढवळ्या केली आहेत. शिवसेना लपून छुपून कोणतेही काम करत नाही. असंही ना. परब म्हणाले. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही लपून छुपून आघाडी केली नाही असंही ना. परब म्हणाले.

शिवसेना कधीही झेंडा बदलणार नाही…

शिवसेनेचा झेंडा भगवा असून शिवसेना कधीही झेंडा बदलणार नाही. भविष्यातही झेंडा बदलणार नाही. आमचा झेंडा भगवाच असून भविष्यातही तो भगवाच राहणार असल्याचेही ना. परब म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments