Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याझटका : पीएमसी बँक खातेदारांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

झटका : पीएमसी बँक खातेदारांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

pmc bank and SC
नवी दिल्ली : पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. चिंताग्रस्त तीन खातेदारांचा मृत्यू झाला. खातेदारांनी पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

पीएमसी बँकेतील खात्यात लाखो रुपयांची ठेवी जमा आहेत. बचत खात्यांमध्ये लाखो रुपये जमा आहेत. मात्र, तरीही खातेदारांना हात पसरावे लागत आहेत. रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्यानंतर लाखो ग्राहक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना आता खात्यातून सहा महिन्यात फक्त चाळीस हजार रुपये काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच तसा निर्णय जाहीर केला आहे. बँकेवरील निर्बंधांविरोधात आणि खातेदार-ठेवीदारांसमोरील अडचणींचा पाढा वाचणारी याचिका दिल्लीतील बिजोन कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाने दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिले.

उच्च न्यायालयात मंगळवारी होणार सुनावणी

याचिकेत बिजोन कुमार मिश्रा यांनी १५ लाख खातेधारकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतानाच, त्यांच्यासाठी १०० टक्के विमा देण्याची मागणी केली होती. तसंच पीएमसी बँकेत जमा रक्कम काढण्यावर लादलेले निर्बंध उठवण्यात यावेत आणि खातेदारांना गरजेनुसार पैसे काढण्याची मुभा मिळावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेत केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून खातेदारांना दिलासा मिळू शकला नाही. याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तसंच मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

हे आहे प्रकरण?

पीएमसी बँकेच्या १३७ शाखा आहेत आणि ही देशातील अव्वल १० को-ऑपरेटिव्ह बँकांपैकी एक आहे. पीएमसी बँकेच्या व्यवस्थापनाकडून एनपीए आणि कर्ज वितरणासंबंधी आरबीआयला चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर आरबीआयनं बँकेवर आर्थिक निर्बंध लादले. त्यानुसार, आता बँक ग्राहकांना ठराविक रक्कम खात्यातून काढता येणार आहे. आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर सुरुवातीला खातेदारांना सहा महिन्यांत फक्त १ हजार रुपयेच काढता येणार होते. त्यानंतर खातेदार आणि ठेवीदारांचा संताप पाहता रिझर्व्ह बँकेनं या कालावधीत १० हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. त्यानंतर २५ हजार आणि काही दिवसांपूर्वी सहा महिन्यांत ४० हजार रुपये काढण्याची मुभा खातेदारांना देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments