Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याया पाच कुटुंबातील उमेदवारांमध्ये काँटेकी टक्कर

या पाच कुटुंबातील उमेदवारांमध्ये काँटेकी टक्कर

Maharashtra BJP Congress MNS NCP ShivSenaमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाच कुटुंबियांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. पाचही कुटुंबातिल उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे परळी,बीड, निलंगा, पुसद, माण खटाव, मतदारसंघात बिग फाईट होत आहेत.

बीड : जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत बंधू बहिणीमध्ये थेट लढत होत आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे या भाजपाकडून तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे निवडणूक लढत आहेत. दोन्ही पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.pankaja munde dhananjay munde togheter

बीड –  विधानसभा मतदारसंघामध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे काका पुतणे एकमेकांविरोधात लढत आहेत. जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीवाकडून मैदानात आहेत. यामुळे आरोप प्रत्यारोप झाले. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.sandeep jaydatta kshirsagar

लातूर : जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातून काका- पुतण्या एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर अशोक पाटील निलंगेकर हे काँग्रेसकडून मैदानात आहेत. यामध्ये पुतण्या बाजी मारणार की काका याचीच उत्सुकता मतदारांना लागलेली आहे.

यवतमाळ: जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये दोघं चुलत भाऊ मैदानात उतरले आहेत. इंद्रनील नाईक आणि निलय नाईक हे दोघं चुलत भाऊ आमनेसामने आहेत. भाजपकडून इंद्रनील नाईक हे मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात निलय नाईक हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत.nilay naik Indranil Naik

सातारा: माण खटाव मतदारसंघातून दोन सख्ये भाऊ मैदानात उतरले आहेत. जयकुमार गोरे हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर शेखर गोरे हे शिवसेनेतून निवडणुकीच्या मैदानात आहे. हे दोघही संख्खे बंधू असून या मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत आहे.jaykumar gore and shekhar gore

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments