Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेचा मोदींबद्दल आदर स्वार्थी की नि:स्वार्थी; आशिष शेलारांचा सवाल

शिवसेनेचा मोदींबद्दल आदर स्वार्थी की नि:स्वार्थी; आशिष शेलारांचा सवाल

Shiv Sena's respect for Modi is selfish or Selfless; Ashish Shelar questions Shiv Sena
मुंबई : संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचा मोदींबदला आदर स्वाथी की नि:स्वार्थी; असा सवाल शिवसेनेला केला.

शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेवर घणाघाती टीका केली. शेलार यांनी अमित शाह यांच्या मुलाखतीचा उल्लेख करत, त्यांनी मांडलेली भूमिका सत्य असल्याचं सांगितलं. “अमित शाह यांनी कोणाला खोटं पाडण्यासाठी नाही तर सत्य समोर आणण्याचं काम केलं आहे. अमित शाह यांनी मांडलेली भूमिका सत्य आहे. सत्य सांगितल्यावर काहींची अडचण होत असेल तर आम्ही काही करु शकत नाही. राजकीय स्वार्थापपोटी असत्य पसरवणं अमान्य आहे,” असं शेलार यांनी यावेळी म्हटलं.

राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर बोलताना शेलार यांनी विसंवाद निर्माण करण्याचं काम कोण करतं हे संपूर्ण महाराष्ट्र रोज सकाळी दूरचित्रवाणीवरुन पाहतो अशी टीका राऊत यांच्यावर केली.

“तिन्ही पक्षांचं सुरु असलेलं नाटक महाराष्ट्राला अमान्य आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. मातोश्रीऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका सुरु आहेत,” असं शेलार यांनी यावेळी सांगितलं. “मातोश्रीचा सन्मान ठेवून भाजपा नेते मातोश्रीवर राजकीय चर्चा करण्यासाठी जात असायचे. पण आता सत्तेच्या लालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला जात आहेत. मातोश्रीवरुन कोणी राज ठाकरेंनाही भेटायला जात नव्हतं. पण आता मातोश्री सोडून माणिकराव ठाकरे यांना भेटायला जात आहेत,” असा टोला शेलार यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments