Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध; भाजपच्या राजन तेलींची माघार

काँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध; भाजपच्या राजन तेलींची माघार

Sanjay Daund,Sanjay, Daund

मुंबई : समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली होती. या जागेवर महाराष्ट्र विकास आघाडीकडून काँग्रेसचे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य संजय दौंड यांनी उमेदवारी दाखल केली होती. तर भाजपाकडून राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, तेली यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे संजय दौंड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली.

महाराष्ट्र विकास आघाडी आणि भाजप दोघांनी विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी दिली होती. संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहे. या जागेसाठी २४ जानेवारी रोजी मतदान होणार होते. तर भाजपाकडून राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु भाजपाकडे पुरेसा संख्याबळ नसल्यामुळे राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली.

विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. सध्या धनंजय मुंडे हे राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत. धनंजय मुंडे हे विधानसभेत गेल्यानं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती.

धनंजय मुंडे यांच्या विधान परिषदेच्या जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पुढे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर दोन नावे चर्चेत होती. यात राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे आणि काँग्रेसचे संजय दौंड यांची नावे स्पर्धेत होती. त्यात संजय दौंड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments