Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसंभाजी भिडे तुमचा जन्म स्त्रीच्या गर्भातूनच झाला आहे ना? रुपाली चाकणकरांचा सवाल

संभाजी भिडे तुमचा जन्म स्त्रीच्या गर्भातूनच झाला आहे ना? रुपाली चाकणकरांचा सवाल

Sambhaji Bhide Rupali Chakankar,Sambhaji, Bhide, Rupali, Chakankarमुंबई : ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते’ असे महिलांबाबत आक्षेपार्ह विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. भिडेंच्या या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजी भिडे तुमचा जन्म स्त्रीच्या गर्भातूनच झाला आहे ना?, असा सवाल करत चाकणकर यांनी भिडेंवर तोफ डागली आहे.

हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वावर बोलताना महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भिडे यांच्या विधानावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजी भिडे तुमचा जन्म स्त्रीच्या गर्भातूनच झाला आहे ना?, असा सवाल करत चाकणकर यांनी भिडेंवर तोफ डागली आहे. स्त्री, अस्तित्व, मातृत्व हे शब्द तुमच्यासाठी आकलनापलीकडचे आहेत. हे शब्द तुम्हाला पेलणारे नाहीत. त्यामुळे त्यांचा उच्चार करू नका आणि त्याच्या नादीही लागू नका. ते तुम्हाला जड जाईल. आज तुम्ही मातृत्वाच्या सन्मानाला धक्का लावला आहे. आमचं दुर्दैव इतकंच आहे की, तुमच्यासारखी माणसे महाराष्ट्राच्या मातीत आहेत, अशा शब्दांत चाकणकर यांनी भिडेंना खडेबोल सुनावले.

भिडेंनी समस्त स्त्री जातीचा, तिच्या मातृत्वाच्या सन्मानाचा अपमान केला

कोण आहेत हे संभाजी भिडे? यांना आपण खूप जास्त महत्त्व देतोय असे वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित करत भिडेंनी समस्त स्त्री जातीचा, तिच्या मातृत्वाच्या सन्मानाचा अपमान केला आहे. त्यांचा मी जाहीर निषेध करते. त्यांनी राज्यातील तमाम महिला वर्गाची जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

काय म्हणाले संभाजी भिडे?

राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर बोलताना संभाजी भिडे यांनी स्त्रीत्वाचा अनादर करणारे उद्गार काढले होते. ‘जसं नपुंसकात पुरुषत्व कमी असतं, वांझेस स्त्रीत्व कमी असतं. मग त्यांना आपण नपुंसक आणि वांझ असे शब्द वापरतो. तसंच हिंदूंचं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे’, असे भिडे म्हणाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments