Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशऋषी कपूर दिल्लीच्या रूग्णालयात दाखल!

ऋषी कपूर दिल्लीच्या रूग्णालयात दाखल!

Rishi Kapoor,Rishi, Kapoorनवी दिल्ली : ऋषी यांना दिल्लीतील रुग्णालयात प्रकृती बिघडल्यामुळे भरती करण्यात आले. याबद्दल नीतू यांना कळताच त्या तातडीने दिल्लीत पोहोचल्या. आलियाही गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं चित्रीकरण संपवून रणबीरसोबत दिल्लीत दाखल झाली.

ऋषी कपूर गेल्या वर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. जवळपास ११ महिन्यांनी ते भारतात परतले. आता ऋषी कपूर यांची तब्येत पुन्हा बिघडली. अरमान जैनच्या मेहंदीला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत कपूर कुटुंबिय उपस्थित होतं. यावेळी ऋषी आणि नीतू कपूर या सोहळ्याला उपस्थित नव्हते. एवढंच नाही तर रणबीर कपूर आणि आलिया भट्टही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही.

ऋषी कपूर यांच्यावर न्यूयार्कमध्ये कर्करोगावर उपचार करण्यात आले होते. ऋषी यांनी लगेच काम करायला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द बॉडी’ सिनेमात ते अखेरचे दिसले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments