skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे बैठकीला आले अन् १० मिनिटात निघून गेले...

राज ठाकरे बैठकीला आले अन् १० मिनिटात निघून गेले…

मुंबई : मनसेला १४ वर्षापासून आलेल्या अपयशामुळे मनसेनं आपला अजेंडा हिंदुत्वाकडे वळविला आहे. मनसेनं बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांविरोधात ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चेाची हाक दिली आहे. पूर्व तयारी म्हणून आज सोमवारी रंगशारदा मदिरात राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी राज ठाकरे आले आणि मार्गदर्शन न करताच १० मिनिटात निघून गेले.

मनसेचा २३ जानेवारी रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन झालं. यावेळी राज ठाकरेंनी आरोप केला होता की, पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मोर्चा काढणार आहोत. त्यासाठी मनसेनं मोर्च्या काढण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन रुपरेषा ठरविण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यामुळे आज सोमवार ( २७ जानेवारी ) रंगशारदा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी राज ठाकरे आले अन् दहा मिनिटांमध्ये निघून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. राज ठाकरे यांची प्रतिकृती बरी नसल्यामुळे ते निघून गेले अशी चर्चा सुरु आहे परंतु राज ठाकरेंची  दोन तासांपासून वाट बघणारे कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र, नाराज झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments