Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeदेशएअर इंडियाची भागिदारी विकणे म्हणजे ‘राष्ट्रविरोधी’ काम; भाजपचे खासदार भडकले

एअर इंडियाची भागिदारी विकणे म्हणजे ‘राष्ट्रविरोधी’ काम; भाजपचे खासदार भडकले

Narendra Modi,Air India,Subramaniam Swamy,air india sale, sale, air india flight sale, modi government, swami, subramniam, modi, narendra prime minister

नवी दिल्ली :  केंद्र सरकार एअर इंडियाची १०० टक्के भागीदारी विकण्यावरून सत्ताधारी भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी संताप व्यक्त केला. हा प्रकार म्हणजे राष्ट्रविरोधी असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच सरकारवर केला आहे.

केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयानं या बाबत घोषणा केल्यानंतर खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केंद्र सरकार विरोधात न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. ही डील राष्ट्रविरोधी असून, आम्ही आपल्या परिवाराचा रत्न विकू देणार नाही असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.

 

केंद्राने मागवल्या निविदा…

एअर इंडियाने भागीदारी विकण्यासाठी निविदा मागवल्या. १७ मार्च २०२० ही शेवटची तारीख आहे. केंद्र सरकारने याच बरोबर सब्सिडीयरी कंपनी एअर इंडिया एक्सप्रेस आणि एयरपोर्ट सर्विस कंपनी AISATS ला विकण्यासाठी निविदा मागवल्या. एअर इंडिया विकण्यासाठी गृफ ऑफ गृह मंत्री अमित शाहच्या अध्यक्षतेखाली जीओएमची बैठकीत निर्णय घेतला गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments