Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई...इतना ही खुद को तराशा होता तो; देवेंद्र् फडणवीसांना शायरीतून टोला

…इतना ही खुद को तराशा होता तो; देवेंद्र् फडणवीसांना शायरीतून टोला

Devendra Fadnavis Priyanka Chaturvedi,Devendra, Fadnavis, Priyanka, Chaturvedi,BJP,Congress

मुंबई : शिवसेना विरूध्द भाजप असा सामना जोरदार रंगला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीसांवर ट्विट करत हल्लाबोल केला.

उम्र जाया कर दी लोगों ने
औरों के वजूद में नुक्स निकालते निकालते
इतना ही खुद को तराशा होता तो

फ़रिश्ते बन जाते


असं ट्विट करत टोला लगावला. शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा माजी मुख्यमंत्री असा नामोल्लेख करत त्यांना एक ट्विट समर्पित केलं आहे. ज्यात त्यांनी फडणवीस यांना स्वाध्याय करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेने भाजपापासून फारकत घेतली तेव्हापासून भाजपचे नेते हल्लाबोल करत आहेत.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे भूमिका मांडत आहे. सरकारच्या निर्णयांवर टीका करण्याबरोबरच शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस आणि भाजपाकडून टीका केली जात आहे. जेएनयूमध्ये सुरू झालेल्या वादावरूनही फडणवीस यांनी उध्दव ठाकरे  यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेनं मार्मिक प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक शेर समर्पित केला आहे. ज्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या आधी विरोधी पक्षनेते न म्हणता माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. इतराच्या चुका काढत बसण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरिक्षण केलं असतं, तर आज ईश्वराचे दूत झाला असता, असं म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित,” असं प्रियंका चतुर्वेदी यांनी शेवटच्या ओळीत म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments