Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईछत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी; संभाजी राजे संतापले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी; संभाजी राजे संतापले

Video : बघा काय आहे या व्हिडीओत

Sambhaji Chhatrapati Modi Shah,Sambhaji Chhatrapati, Modi, Shah,Sambhaji, Chhatrapati,Tanhaji,Narendra Modi,Amit Shah,Sambhaji Rajeमुंबई : ‘आज के शिवाजी’- नरेंद्र मोदी पुस्तकाचा वाद शमण्यापूर्वीच पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला आहे. ‘द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिक चित्रपटातील काही प्रसंगाला मॉर्फिंग करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा लावण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे संतापले आहेत. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड थंडीत आहे परंतु दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल कीडा’ या ट्विटर हँडलवरून हा मार्फ केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर आता छत्रपती संभाजी राजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हा प्रकार अशोभनीय, असहनिय आणि निंदनीय…

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हा प्रकार अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय आहे. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. या प्रकरणावर ट्विट करून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.

आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, असं आवाहनही त्यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

काय आहे या व्हिडीओत?

व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला नाही. नरेंद्र मोदी व अमित शाह हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे. ‘शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,’ असे संवादही यात घालण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments